scorecardresearch

गोव्यात एकत्र व्हेकेशनसाठी गेले होते हृतिक- सबा? वाचा कशी झाली होती दोघांची पहिली भेट

मागच्या काही दिवसांपासून सबा आझाद आणि हृतिक रोशन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

hrithik roshan, saba azad, hrithik roshan girlfriend, hrithik roshan instagram, hrithik roshan gossips, saba azad instgram, हृतिक रोशन, सबा आझाद, हृतिक रोशन सबा आझाद भेट, हृतिक रोशन इन्स्टाग्राम, सबा आझाद बॉयफ्रेंड
सबा आणि हृतिक एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद एकत्र दिसले. तेव्हापासून या दोघांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या दोघांचे व्हिडीओ बरेच व्हायरल झाले होते. त्यानंतर हे सबा आणि हृतिक एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अर्थात हृतिक किंवा सबानं याबाबत अद्याप पुष्टी केलेली नाही. मात्र दोघांच्याही नावाची चर्चा मात्र सोशल मीडियावर जोरदार होताना दिसत आहे. पण या दोघांची पहिली भेट कशी झाली याची माहिती आता समोर आली आहे.

सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेली ही जोडी पहिल्यांदा कशी काय भेटली याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार हृतिक रोशन आणि सबा आझाद त्यांच्या एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेटले होते. पहिल्या भेटीनंतर दोघंही एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. पण काही दिवसांपूर्वीच डिनर डेटनंतर एकत्र स्पॉट झाल्यानं ही गोष्ट पहिल्यांदाच समोर आली. दरम्यान ही भेट आणि डिनर काही निमित्त असल्याचं समोर आलं. पण तोपर्यंत सोशल मीडियावर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.

‘मिड डे’नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हे दोघंही सुट्ट्यांसाठी एकत्र गोव्यालाही गेले होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सबाला, ‘हृतिकला डेट करत आहेस का?’ असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिनं या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. पण ‘बॉलिवूड हंगामा’नं त्यांच्या एका वृत्तामध्ये मात्र हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हृतिकला त्याचं खासगी आयुष्य सर्वांसमोर येऊ द्यायचं नाही. त्यामुळे त्यानं अद्याप या चर्चांवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान हृतिक रोशननं २०१४ साली पत्नी सुझान खानपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याचं नाव काही अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. काही दिवसांपूर्वी तो हॉलिवूड अभिनेत्री सामंथा लॉकवूडसोबत दिसल्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. हृतिकच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच तो अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’ चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hrithik roshan and saba azad went to goa vacation know about they are first meeting mrj

ताज्या बातम्या