कियारा आणि हृतिकमध्ये नेमकं काय सुरु आहे? हृतिकने विचारलेला प्रश्न ऐकून व्हाल हैराण

यावेळेला ह्रतिकची एक पोस्ट व्हायरल झालीय आणि व्हायरल होण्याचं कारण फोटो नव्हे तर त्यासोबत लिहिलेली एक कॅप्शन आहे.

hrithik-roshan-ask-to-kiara-advani-a-personal-question

बॉलिवूडचा ‘हॅंडसम हंक’ ह्रतिक रोशनचा प्रत्येक अंदाज त्यांच्या चाहत्यांना आवडत असतो. ह्रतिक रोशनचने केवळ त्याच्या जबरदस्त अदाकारीनेच नाही तर उत्तम डान्स, शानदार फिटनेस आणि जबरदस्त स्टंट्सने सुद्धा लाखो चाहत्यांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी ह्रतिक रोशन त्याच्या सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो शेअर करत असलेले प्रत्येक फोटोज नेहमीच व्हायरल होत असतात. पण यावेळेला त्याची एक पोस्ट व्हायरल झालीय आणि व्हायरल होण्याचं कारण फोटो नव्हे तर त्यासोबत लिहिलेली एक कॅप्शन आहे. यात त्याने अभिनेत्री कियारा अडवाणी हिला टॅग करत एक खाजगी प्रश्न केलाय. ह्रतिक रोशनने केलेला हा प्रश्न पाहून सगळेच जण हैराण आहेत.

अभिनेता ह्रतिक रोशनने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट शेअर केलंय. या ट्विटमध्ये ह्रतिकने त्याचा कूल लुकमधला एक फोटो शेअर करताना एक कॅप्शन लिहिली आहे. “कियारा आडवाणी, तुला काय वाटतंय, हे योग्य दिसतंय का?” असं लिहून ह्रतिक रोशनने कियारा अडवाणीला टॅग केलंय.

ह्रतिक रोशनने हे ट्विट शेअर केल्यानंतर त्याचे फॅन्स मात्र घोळात पडले. ह्रतिक रोशनने कियाराला असं का विचारलं असेल, याबाबत अंदाज लावताना दिसून येत आहे. कारण यापूर्वी कधीच या दोघांमध्ये इतकी घट्ट मैत्री दिसून आली नाही. यावरून ह्रतिक रोशन आणि कियारा अडवाणी हे दोघे लवकरच एका चित्रपटात एकत्र झळकणार असा अंदाज व्यक्त केला जातोय. जर असं झालं तर हे दोघेही पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. अभिनेत्री कियारा अडवाणीने खूप कमी काळात तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केलीय.

सोनू सूदने त्याच्या वाढदिवशी व्यक्त केली इच्छा ; म्हणाला, “हॉस्पिटलमध्ये…..”

 

या चित्रपटात दिसू शकतील ह्रतिक आणि कियारा

ह्रतिक आणि कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर दोघांच्याही जवळ एका पेक्षा एक शानदार चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. अभिनेता ह्रतिक रोशन लवकरच ‘क्रिश 4’, ‘फायटर’ आणि साउथ फिल्म ‘विक्रम वेधा’ यांच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. तर कियारा ‘शेरशाह’, ‘जुग जुग जियो’ आणि ‘भूल भुलैया 2’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hrithik roshan ask to kiara advani a personal question on his pic prp

ताज्या बातम्या