Video: पिंकी रोशन यांचा मुलगा हृतिकसोबतचा भन्नाट डान्स तुम्ही पाहिलात का?

हृतिक आणि पिंकी रोशन यांचा हा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूड कलाकारांनी आनंदाने आणि उत्साहाने दिवाळी साजरी केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट चर्चेचा विषय ठरला आहे. आता बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा आई पिंकी रोशनसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे डान्स करताना दिसत आहेत.

हृतिक रोशनने कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली आहे. दरम्यान, पिंकी रोशन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये पिंकी आणि हृतिक रोशन डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये हृतिकने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर पिंकी यांनी गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

पिंकी यांनी व्हिडीओ शेअर करत छान असे कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पिंकी या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्या सतत कुटुंबीयांसोबत वेळ घालवतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. दिवाळी साजरी करताना देखील त्यांनी फोटो शेअर केले आहेत. सध्या त्यांचे हे व्हिडीओ आणि फोटो चर्चेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hrithik roshan dancing with his mom pinkie on the song boom boom is unmissable avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या