बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हे कायम चर्चेत असतात. जेव्हा त्यांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली तेव्हा हृतिकच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. लग्नाच्या १४ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही ते मुलांसाठी नेहमीच एकत्र येताना दिसतात. त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते आहे. मात्र, आता सुझानने तिच्या आयुष्यात मुव्हऑन केल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुझान बिग बॉस १४मधील स्पर्धक अली गोणीच्या भावाला, अर्सलनला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. पण याबाबत त्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती. पण आता अर्सलनच्या पोस्टवर सुझानने कमेंट केल्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वी सुझानने तिचा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने अर्सलनने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने सुझानसाठी ‘डार्लिंग’ हा शब्द वापरला होता. ती पोस्ट पाहून सुझानने देखील उत्तर दिले होते. अर्सलनच्या पोस्टवरील सुझानचे उत्तर पाहून त्यांनी प्रेमाची कबूली दिली असल्याचे म्हटले जात आहे.
आणखी वाचा : ‘इंडस्ट्रीमधील प्रत्येकाची मुले एकदा तरी तुरुंगात जातील…’, मिका सिंग संतापला

Helper wanted in momo shop salary
मोमोच्या दुकानात हवाय मदतनीस, जाहिरात होतेय व्हायरल, पगाराचा आकडा पाहून प्रत्येकाला हवी आहे ही नोकरी
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर
youth was kidnapped
खळबळजनक..! मृतदेहाची इन्स्टाला स्टोरी (स्टेटस) ठेवली; ‘त्या’ तरुणाची अपहरण करून केली हत्या
einstein brain history
आइन्स्टाईनच्या मेंदूची चोरी आणि २४० तुकडे; जाणून घ्या महान वैज्ञानिकाच्या मृत्यूनंतरचे गूढ

काय होती अर्सलनची पोस्ट?
अर्सलनने सुझानसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्याने, ‘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डार्लिंग.. मी प्रार्थना करतो की हे वर्ष तुझ्यासाठी आनंदी असेल. हा आपला सर्वांत चांगला फोटो आहे. खूप प्रेम आणि शुभेच्छा’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

त्याची ही पोस्ट पाहून सुझानने कमेंट केली आहे. सुझानने ‘धन्यवाद, धन्यवाद, माझे सर्वकाही’ अशी कमेंट केली आहे. त्या सोबतच हार्ट इमोजी देखील वापरले आहे.

हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. सुझान आणि अर्सलनने त्याच्या नात्यावर अजून वक्तव्य केलेले नाही. अर्सलन लवकरच अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. यात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.