बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर यांच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळात हृतिकने अनेक गरजुंना मदत केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता त्याने चक्क एका रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली आहे.

एका रिक्षाचालकाच्या मुलाचं बेली डान्सर होण्याचं स्वप्न हृतिकमुळे पूर्ण होणार आहे. हृतिकने त्याच्या एचआरके फिल्म्सच्या माध्यमातून या मुलाला मदत केली आहे. त्यामुळे या रिक्षाचालकाच्या मुलाने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणे हृतिकचे आभार मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

Thank you so much @hrithikroshan @hrxfilms for supporting my student @noddy_singh_official

A post shared by Mario Fernando Aguilera (@fernandoaguileraindiaofficial) on


हृतिकने दिल्लीतील एका इ रिक्षाचालकाच्या मुलाला कमल सिंह याला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ३ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. कमल सिंह याला बॅले डान्सर व्हायचं असून त्याला इंग्लंडमधील ‘द इंग्लिश बॅले स्कूल ऑफ लंडन’ येथे बॅले डान्सचं प्रशिक्षण घ्यायचं होतं. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्याचं स्वप्न पूर्ण होण्यास अडचणी येत होत्या. मात्र हृतिकने या अडचणी दूर केल्या आहेत. कमल सिंहचे शिक्षक फर्नांडो गुइलेरा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

दरम्यान, फर्नांडो यांनी हृतिकने केलेल्या मदतीसाठी त्याचे आभारदेखील मानले आहेत. यापूर्वी हृतिकने अनेक गरजुंना मदत केली आहे. लॉकडाउनच्या काळातही त्याने विविध माध्यमांमधून गरजुंची मदत केल्याचं पाहायला मिळालं.