hrithik roshan shares new dialogue promo with saif ali khan from vikram vedha gf saba azad reacts spg 93 | 'विक्रम वेधा' चित्रपटातील हृतिकचा संवाद पोस्ट करत सबा आझाद म्हणाली, " आता प्रतीक्षा.. " | Loksatta

‘विक्रम वेधा’ चित्रपटातील हृतिकचा संवाद पोस्ट करत सबा आझाद म्हणाली, ” आता प्रतीक्षा.. “

गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.

‘विक्रम वेधा’ चित्रपटातील हृतिकचा संवाद पोस्ट करत सबा आझाद म्हणाली, ” आता प्रतीक्षा.. “
saba azad reacted on hrithik post

‘ब्रह्मास्त्र’, ‘चूप’ बॉक्स ऑफिस चांगली कमाई करताना दिसून येत आहेत. बिग बजेट ब्रह्मास्त्र, चित्रपटाने तर ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. दुसरीकडे सनी देओल, दुलकिर सलमानचा ‘चूप’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हृतिक रोशन, सैफ अली खान यांचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलर बघितल्यापासून चाहते चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहेत. इतकंच नव्हे ह्रतिकच्या प्रेयसीने पोस्ट शेअर केली आहे.

चित्रपटाचा ट्रेलर रंजक पद्धतीने बनवला आहे. ऍक्शन सीन्स, जबरदस्त संवाद, उत्कंठा वाढवणारे पार्श्वसंगीत अशा गोष्टी ट्रेलरमध्ये जुळून आल्या आहेत. हृतिकच्या प्रेयसी सबा आझादने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटातला हृतिकचा एका संवाद पोस्ट करत म्हणाली ‘आता प्रतीक्षा करू शकत नाही’. हृतिक रोशन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. हृतिक रोशन अभिनेत्री आणि मॉडेल सबा आझादला डेट करत असल्याचे बोललं जातं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.

ब्रह्मास्त्र’, ‘चूपच्या’ शर्यतीत आर.माधवनचा हा चित्रपट पडला मागे; स्वस्त तिकीट असूनही प्रेक्षकांनी फिरवली पाठ

हृतिक बॉलिवूड पार्टी असो वा पुरस्कार सोहळा गर्लफ्रेंड सबाबरोबर तिथे हजेरी लावताना दिसतो. या दोघांचं नातं आता जगजाहिर झालं आहे. हृतिकने सबाबरोबर असलेल्या नात्याचा कधीच उघडपणे स्वीकार केला नसला तरी दोघांचं नातं हे कोणापासून लपून राहिलेलं नाही.सुझान खानबरोबर अनेक वर्ष संसार केल्यानंतर दोघंही विभक्त झाले. पण आपल्या मुलांसाठी हे दोघं अजूनही एकत्र येतात.

दरम्यान विक्रम वेधाया चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या या सगळ्यांच्या वतीने विक्रम वेधा हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे. हृतिकचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आयुष्मान खुराना दिसणार नव्या अवतारात; दोन वेण्या घातलेला ‘या’ चित्रपटाच्या सेटवरचा फोटो झाला लीक

संबंधित बातम्या

“तुम्ही मराठीत…” पूनम पांडेने पार्टीत थेट पत्रकारांना विचारला प्रश्न
“एकाही व्यक्तीने मी खोटं सांगितल्याचं सिद्ध केलं तर…”, विवेक अग्निहोत्री यांची मोठी घोषणा, म्हणाले “आता मी काश्मीर फाइल्सचा…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नोटाबंदीबाबत मूकदर्शक बनणार नाही!; सर्वोच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेला सुनावले
गोवर लसीकरण मोहीम दोन टप्प्यांत
Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक एसटी सेवा तूर्तास बंद; ६६० बस फेऱ्यांवर परिणाम
मुंबईतील हवा ‘अत्यंत वाईट’; धुरक्याच्या प्रमाणात वाढ
चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम नव्या शैक्षणिक वर्षांपासून; उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे निर्देश