scorecardresearch

हृतिकच्या कथित गर्लफ्रेंडचा फोटो शेअर करत, सुझान खान म्हणाली…

हृतिक आणि सबा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या.

hrithik roshan, sussanne khan, saba azads, hrithik
हृतिक आणि सबा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या.

अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पूर्वश्रमीची पत्नी सुझान खान घटस्फोटानंतरही चांगले मित्र आहे. सुझान ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच सुझानने हृतिकची कथीत गर्लफ्रेंड सबा आझादचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फक्त व्हिडीओ शेअर केला नाही तर तिची स्तुती देखील केली आहे.

सुझानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो मुंबईतील एका कॉन्सर्टमधला आहे. हा फोटो शेअर करत ‘सबा तू एक सुंदर संध्याकाळ! तू सुपर कूल आहेस आणि अत्यंत प्रतिभावान आहेस,’ असे कॅप्शन सुझानने दिले आहे. सुझानची ही पोस्ट शेअर करत सबा सुझानला उत्तर देत म्हणाली ‘धन्यवाद सुझी, तू काल तिथे होतीस याचा मला आनंद आहे.’

आणखी वाचा : “लतादीदी गेल्यानंतर तुम्ही जसे रडलात तसे माझ्या…”, मुमताज यांनी चाहत्यांना केली विनंती

दरम्यान, गेल्या महिन्यात हृतिक आणि सबाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हारल झालेल्या व्हिडीओत हृतिक एका हॉटेलमधून बाहेर पडताना दिसला. यावेळी त्याने सबाचा हात पकडला होता. हृतिक तिचा हात पकडून तिला त्याच्या गाडी जवळ घेऊन जातो आणि गाडीत बसून तिला सोबत घेऊन जातो.

आणखी वाचा : सुशांत सिंग राजपुतमुळे दीपिकाचा ‘गहराइयां’ झाला फ्लॉप?

सबाने २००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दिल कबाडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. गेल्या वर्षी सबा ‘फिल्स लाइक इश्क’ या नेटफ्लिक्सवरील सीरिजमध्ये दिसली होती. याशिवाय ‘रॉकेट बॉइज’ या वेब सीरिजमध्ये ती दिसली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hrithik roshans ex wife sussanne khan cheers for saba azads musical show amid dating rumours dcp

ताज्या बातम्या