बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणजेच हृतिक रोशन आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करायला सज्ज झाला आहे. विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ या सिनेमातून तो मराठी सिनेसृष्टीत प्रवेश करत आहे. फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस या सिनेमाद्वारे लेखक-दिग्दर्शक-निर्माता अशा तिहेरी भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच मुंबईतील जुहू पीव्हीआर थिएटरमध्ये सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. शामक दावर, हृतिक रोशन, अमित सुरी यांच्या उपस्थितीत ‘हृदयांतर’ सिनेमाचा भावनांना हात घालणारा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देत सिनेमाच्या टीमने कार्यक्रमात रंगत आणली.

ट्रेलरमध्ये हृतिकची झलक फार कमी सेकंदांसाठी दिसत असली तरी हा संपूर्ण ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनातली सिनेमाबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढेल यात काही शंका नाही.

१०.०९ः अमित सुरी हा एकच माणूस होता जो पहिल्या क्षणापासून माझ्या पाठी खंबीरपणे उभा होता

१०.०७ः हृतिकच्या शेवटच्या सीनवर हृदयांतरचे चित्रीकरण संपवण्यात आले

१०.०३ः आतापर्यंत विक्रमचे कपडे बघत आलो आता त्याच्या मागचा माणूस या सिनेमातून सर्वांना कळेल- सुबोध भावे

१०.००ः मी पहिल्यांदा हा सिनेमा हिंदीमध्ये लिहिला पण हा सिनेमा मराठीत होणं हेच कुठेतरी लिहिलेलं होतं असं मला वाटतं- विक्रम फडणीस

०९.५७ः गेल्या कित्येक वर्षांपासून माझ्या मनावर ‘हृदयांतर’ सिनेमासारखा प्रभाव कोणत्याच सिनेमाने पाडला नव्हता

०९.५५ः शामक दावर या सिनेमात अभिनय करताना दिसेल

०९.५०ः ‘एक डाव धोबी पछाड’ या सिनेमानंतर मुक्ता-सुबोध तब्बल नऊ वर्षांनी एकत्र झळकणार आहेत.

०९.४८ः हृतिकसोबत काम करताना मी भारावून गेले- मुक्ता बर्वे

०९ः४५ः अभूतपूर्व अनुभव दिल्याबद्दल मी विक्रमचेच आभार मानेन- हृतिक रोशन

०९.४२ः हा सिनेमा माझ्यासाठी आयुष्य बदलवणारा आहे- सोनाली खरे

०९४०ः मराठीतल्या दोन तगड्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी माझ्यासाठी आयुष्यभराची ठेव आहे

०९.३८ः माझ्यासाठी हा सिनेमा खूप बदल घेऊन आला- मुक्ता बर्वे

०९.३५ः शामक दावरनेही लावली ट्रेलर लॉन्चला उपस्थिती

०९.३२ः हतिकची छोटीशी छलक ट्रेलरमध्ये दिसते

०९.२९ः प्रत्येकाच्या मनातली गोष्ट सांगणारा हा सिनेमा आहे

०९.२८ः माझ्यासाठी हृदयांतर हा एक सिनेमा नाहीये तर ती एक आशा आहे- हृतिक रोशन

०९.२७ः प्रत्येक व्यक्तिरेखेची ओळख या ट्रेलर लॉन्चला दाखवण्यात येत आहेत

०९.२५ः ‘हृदयांतर’च्या ट्रेलर लाँचला हृतिक रोशन, विक्रम फडणवीस, मुक्ता बर्वे, सुबोध भावे यांची उपस्थिती