scorecardresearch

अभिनेत्री हृता दुर्गुळे अडकली विवाहबंधनात, समोर आला लग्नाचा पहिला फोटो

हृता दुर्गुळेच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

hruta durgule, pratik shah, hruta durgule got married, hruta durgule pratik shah marriage, hruta durgule marriage photo, hruta durgule instagram, हृता दुर्गुळे, प्रतीक शाह, हृता दुर्गुळे लग्न, प्रतीक- हृता विवाहबंधनात, हृता दुर्गुळे लग्नाचा फोटो, हृता दुर्गुळे पती, हृता दुर्गुळे इन्स्टाग्राम
सोशल मीडियावरून हृता आणि प्रतीक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

‘फुलपाखरू’ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली. हृताने डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर आता या दोघांनी नुकतीच लग्नागाठ बांधली असून या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. सोशल मीडियावरून हृता आणि प्रतीक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

‘मराठी सीरियल्स ऑफिशियल’ या इन्स्टाग्राम पेजवरून हृता आणि प्रतीक यांच्या लग्नातील फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये हिंदी टीव्ही जगतातील बरेच कलाकार दिसत असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हृताच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत तिला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा- सलमान खानच्या ईद पार्टीला का गेली होती कंगना रणौत? अखेर समोर आलं खरं कारण

दरम्यान हृता किंवा प्रतीक शाह यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवरून लग्नाबाबत कोणतीही पोस्ट किंवा फोटो शेअर केलेला नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये हिंदी टीव्ही जगतातील कलाकारांसोबत हे दोघंही पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये हृताच्या भांगेत कुंकू, हातात हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसुत्र दिसत आहे.

आणखी वाचा- Video: चुलीवरचं जेवण अन् नाना पाटेकरांनी वाढलेली थाळी, राहुल देशपांडेंनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

हृता दुर्गुळेनं काही महिन्यांपूर्वीच एका मुलाखतीत आपल्या प्रेमाची कबुली देत बॉयफ्रेंड प्रतीक शहाची ओळख करून दिली होती. प्रतीक हा हिंदी टीव्ही क्षेत्रात कार्यरत असून त्याची आई मुग्धा शहा या मराठी आणि हिंदी टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. हृता आणि प्रतीक यांचा साखरपुडा २५ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता. त्यानंतर हे दोघं लग्न कधी करणार याकडेच चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hruta durgule got married with prateek shah see here first photo of marriage mrj

ताज्या बातम्या