हृता दुर्गुळेची होणारी सासू आहे ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री

हृताने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ती प्रतीक शाहसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं.

hruta durgule, mugdha shah,
हृताने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ती प्रतीक शाहसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं.

छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरू’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री हृता दुर्गेुळे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हृता सोशल मीडियावर सक्रिय असल्याते दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहते. हृता गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे.

हृता प्रसिद्ध दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने सांगितलं होतं. सध्या प्रतीक आणि हृताचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तर प्रतीक हा लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. मुग्धा यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

आणखी वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण

आणखी वाचा : प्रियांका होणार आई? निकसोबत चाहत्यांनाही बसला धक्का

मुग्धा यांनी ‘बे दुणे साडे चार’, ‘मिस मॅच’, ‘कर्तव्य’, ‘माहेर माझं पंढरपूर’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्रतीक शाह हे नाव छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे. प्रतीकने ‘बेहद २’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदणी’ यासारख्या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hruta durgule s mother in law is also a famous actress dcp

ताज्या बातम्या