बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे परिनीती चोप्रा. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. परिणीती आता लवकरच एका रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून काम करणार आहे. स्वत: परिणीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शोच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. आता परिणीती रिअॅलिटी शोमध्ये दिसणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. पण नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये परिणीतीने रिअॅलिटी शोबाबत केलेल वक्तव्य चर्चेत आहे.
परिणीतीने नुकतीच इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने परिक्षकांना रिअॅलिटी शोमध्ये कधीही स्क्रीप्ट दिली जात नाही आणि त्यांनी काय बोलायचे हे देखील आधी ठरवलेले नसते असा खुलासा केला.
आणखी वाचा : ‘पुष्पा’नंतर अल्लू अर्जुनचा ‘हा’ चित्रपट होणार हिंदीमध्ये प्रदर्शित, टीझर सोशल मीडियावर चर्चेत




‘जे लोक रिअॅलिटी शोसोबत जोडलेले नसतात ते अशा गोष्टी बोलताना दिसतात. मी माझ्या एकंदरीत अनुभवावरुन सांगत आहे. आम्हाला कधीही स्क्रीप्ट दिली जात नाही किंवा काय बोलायचे हे सांगितले जात नाही. आम्ही कधीही शोपूर्वी स्पर्धकांना भेटत नाही. स्पर्धकांचा परफॉर्मन्स पाहून आमची जी प्रतिक्रिया असते ती त्यावेळी समोर दिसणाऱ्या परफॉर्मन्सवर असते. जर एखाद्या स्पर्धकाला त्याची कथा सांगायची असेल तर ती त्याने का सांगू नये? त्यांचे टॅलेंट फेक नसते आणि त्यांना परफॉर्म करण्यासाठी एक संधी दिली जाते. जे काही रिअॅलिटी शोमध्ये दाखवले जाते ते खरे असते’ असे परिणीती म्हणाली.
परिणीती चोप्रा लवकरच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘हुनरबाज: देश की शान’मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये ती करण जोहर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत परिक्षक म्हणून दिसणार आहे. चाहते परिणीतीला परिक्षकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी आनंदी आहेत.