‘न्यूड सीन देण्यास माझा नकार नाही, पण…’, नेहा पेंडसेचा खुलासा

तिने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता.

neha pendase,

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘भाभीजी घर पर है.’ या मालिकेतील गोरी मेम म्हणजेच अनिता भाभीची भूमिका अभिनेत्री नेहा पेंडसे साकारताना दिसत आहे. तिला या भूमिकेत पाहताना चाहत्यांना आनंद होत आहे. काही दिवासांपूर्वी नेहाने बॉयफ्रेंड शार्दुलशी लग्न केले. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये तिने भविष्यात न्यूड सीन देण्याविषयी वक्तव्य केले होते.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला न्यूड सीन देण्याविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने ‘भविष्यात न्यूड सीन देण्यास मला कोणतीही समस्या नाही. पण केवळ अशा चित्रपटांमध्ये ज्याची कथा लव्ह मेकिंग आणि किसिंग सीन भोवती फिरत असते. एक वेळ अशी होती जेव्हा मला वाटायचे की, ना लव्ह मेकिंग सीन ना किसिंग सीन मी केवळ अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकेन. चांगल्या चित्रपटांमुळे मला एक गोष्ट कळाली जर चित्रपटाचे निर्माते चांगले असतील आणि असे सीन ते योग्य पद्धतीने दाखवत असतील किंवा चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये किसिंग सीन आणि न्यूड सीन देण्याची गरज आहे तर मी ते नक्की देईन’ असे उत्तर दिले होते.

आणखी वाचा : अभिमानास्पद! करोना रुग्णांच्या मदतीसाठी सुपरस्टार बनला रुग्णवाहिका चालक

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

पुढे नेहा म्हणाली, ‘पण काही चित्रपट ज्यांची कथा केवळ किसिंग सीन आणि लव्ह मेकिंग सीनच्या भोवती फिरत असते अशा चित्रपटांमध्ये मी काम करु इच्छित नाही. मी चांगले बोल्ड सीन देखील पाहिले आहेत. ते चांगले का आहेत कारण निर्मात्यांनी ते तशा पद्धतीने शूट केले आणि चित्रपटांमध्ये दाखवले. कधी कधी सीन चुकीच्या पद्धतीने दाखवले जातात. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: I am not against bold and kissing neha pendse on bold scene avb

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या