बिपाशानेही केले ‘सैफिना’ चे अभिनंदन

‘मी करीना आणि सैफसाठी फार खुश आहे’

‘अजनबी’ आणि ‘रेस’ या चित्रपटांमध्ये सैफ अली खान व करीना कपूरसोबत सहकलाकार म्हणून काम केलेली अभिनेत्री बिपाशा बसू ही सुद्धा करीनाच्या आई होण्याच्या बातमीने फार आनंदात दिसते आहे. काही दिवसांपूर्वी करीना आणि बिपाशामध्ये असणारे रागरुसवे आता दूर झाल्याचे दिसत आहे. करीनाची आई होण्याची बातमी कळताच बिपाशाने ‘मी करीना आणि सैफसाठी फार खुश आहे, आता त्यांचे कुटूंब वाढणार आहे ही आनंदाचीच बाब आहे’, अशा शब्दांत ‘सैफिना’ चे अभिनंदन केले आहे. नवनिवाहित बिपाशाने आपल्या लग्नाविषयी बोलताना, ‘तुम्ही जर बरोबर व्यक्तिसोबत लग्न केले, तर यात तणावाचा प्रश्नच येत नाही’ असे विधान केले आहे. पती करणसिंग ग्रोव्हरसोबतच्या तिच्या ‘स्पेन’परतीबद्दल सांगताना ‘स्पेन हा अत्यंत सुंदर देश आहे, आम्ही तिथे खूप फिरलो; सगळ्यांनी एकदा तरी या सुंदर देशाला भेट द्यावी’ असेही बिपाशा म्हणाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: I am very happy for kareena kapoor and saif ali khan bipasha basu