छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’ ओळखला जातो. बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व हे इतर पर्वांच्या तुलनेत जास्तच गाजले. मराठी ‘बिग बॉस’मुळे नावारुपाला आलेला अभिनेता म्हणून आदिश वैद्यला ओळखले जाते. सध्या आदिश हा सब टीव्हीवरील पुष्पा इम्पॉसिबल या मालिकेत काम करताना दिसत आहे. जेडी मजेठियाच्या ‘पुष्पा इम्पॉसिबल’ या मालिकेद्वारे तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान आदिश वैद्यला ‘गुम है किसीके प्यार में’ ही मालिका का सोडली याबाबत विचारण्यात आले. त्यावर त्याने स्पष्टीकरण दिले.

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी होण्यापूर्वी आदिश हा ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेत काम करत होतो. मात्र बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी त्याने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान त्याला याबाबत विचारले असता तो म्हणाला, “ती मालिका सोडण्याचा निर्णय घेणं ही माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. पण एक कलाकार म्हणून मला माझ्यातील कलेला विकसित करणे गरजेचे होते. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. पण हा निर्णय एका रात्रीत घेणे अजिबात सोपं नव्हतं. बिग बॉस मराठीमध्ये माझा कार्यकाळ कितीही लहान असला तरी तो माझ्या फायद्यासाठी होता.”

Bigg Boss Marathi 3 Winner : बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा, विशाल निकम ठरला विजेता

“मी अनेक वेबसीरिजमध्ये काम केले आहे. त्यात अनेक उत्तम पात्र साकारली आहेत. यामुळे एक कलाकार म्हणून मला दमदार कामगिरी करणारी पात्र साकारण्याची संधी मिळाली. ही संधी एक कलाकार म्हणून फार गरजेची होती. त्यामुळे गुम है किसीके प्यार में ही मालिका सोडण्याच्या निर्णयाचा मला कधीच पश्चाताप होत नाही. उलट त्यामुळे नवनवीन भूमिका करायला मिळाल्या याचा आनंदच वाटतो असं यावेळी आदीशने सांगितलं. तसेच, भविष्यातही अशाच विविधांगी भूमिका करेन आणि स्वतःमधल्या कलाकाराला खुलवत राहील”, असं ही आदिशनं सांगितलं.

“गुम है किसीके प्यार में’ ही मालिका सोडणे हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता. मला बिग बॉसमधील पात्राचे भविष्य माहिती होते. पण तरीही मला त्या शो चा भाग व्हावं असे वाटले आणि मी शेवटपर्यंत त्याचा आनंद घेतला. त्यामुळे ही मालिका सोडण्याच्या निर्णयाचा मला कधीच पश्चाताप होत नाही. त्याउलट त्यामुळे नवनवीन भूमिका करायला मिळाल्या याचा मला जास्त आनंद वाटतो. त्यासोबतच भविष्यात अशाच विविधांगी भूमिका साकारेन आणि स्वतःमधील कलाकाराला नेहमीच खुलवत राहण्याचा प्रयत्न करेन”, असेही आदिशने म्हटले.

“पुण्यातील चाकण हायवेवर मला दुचाकीस्वाराने धडक दिली अन्…”, बिग बॉस फेम सोनाली पाटीलने सांगितला अनुभव

दरम्यान आदिशनं आतापर्यंत अनेक मराठीसह हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. आदिशने २०१५ मध्ये मराठी शोमध्ये काम करत करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तो तुमचं आमचे सेम आहे, रात्रीस खेळ चाले, जिंदगी नॉट आऊट, कुंकू टिकली आणि टॅट्यूमध्ये दिसला होता. एकता कपूरच्या मालिकेतून आदिशने हिंदी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. २०१८मध्ये तो नागिन या मालिकेत दिसला होता. त्यानंतर त्याने बॅरिस्टर बाबू, साम दाम दंड भेद आणि गुम है किसी के प्यार मध्ये काम केले. आदिश बिग बॉस मराठीसह अनेक वेबसिरीजमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसेच येणाऱ्या काळात तो प्रसिद्ध दिगदर्शक रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या वेब सिरीजमध्येही झळकणार आहे.