scorecardresearch

“निर्माता म्हणून माझ्या प्रत्येक चित्रपटात चुका पण…”, करण जोहरने दिली कबुली

यावेळी शकुन बत्रा आणि करण जौहर यांनी चित्रपट निर्माते म्हणून आपली मते मांडली.

दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा आगामी ‘गहराइयां’ चित्रपटाची सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील इंटिमेट सीनमुळे त्यावर बरीच टीका झाली. सध्या या चित्रपटातील कलाकार या ‘गहराइयां’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाचा निर्माता करण जोहर आणि शकुन बत्रा यांनी चित्रपट समीक्षकांच्या मतावर चर्चा केली.

करण जोहर आणि शकुन बत्रा यांनी यावेळी चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद, त्यावर झालेली टीका, प्रेक्षकांचे आणि समीक्षकांचे रिव्ह्यू याबद्दल चर्चा केली. यावेळी शकुन बत्रा आणि करण जोहर यांनी चित्रपट निर्माते म्हणून आपली मते मांडली. यावेळी करण म्हणाली की, “कोणत्याही कलाप्रकारात बरोबर किंवा चूक असे काहीही नसते. तो एक ठराविक दृष्टीकोन आहे.”

“चित्रपट निर्माता म्हणून माझ्या प्रत्येक चित्रपटात चुका झाल्या आहेत. पण शकुन त्यात वेळेत बदल करेल याची मला खात्री असते. ‘एक मैं और एक तू’, ‘गहराईयां’, ‘कपूर अँड सन्स’ अशा अनेक चित्रपटात मी अनेक चुका केल्या आहे. मी त्या चुका आता पाहू शकतो. पण तुम्हाला त्यासाठी फार वेळ लागेल. पण मी देखील ते केले आहे, असे मला वाटत नाही, असेही करण जोहर म्हणाला.

कारण एकदा समीक्षकाने A असे लिहिले की त्यानंतर वर्षानुवर्षे त्यावर तोच शिक्का राहतो. त्यात सर्व माहिती जमा राहते. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी याबाबतचा दृष्टीकोन ठेवू शकतो का? तर यावर उत्तर कदाचित नाही असेच असेल, असेही त्याने सांगितले.

नवाजुद्दीन सिद्दीकी करणार २७ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स, म्हणाली “कंगना मॅडमने….”

या चित्रपटाचे दिग्दर्शक शकुन बत्राने केले आहे. तर या चित्रपटात दीपिका आणि सिद्धांत चतुर्वेदी व्यतिरिक्त अनन्या पांडे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनने केली आहे. आता हा चित्रपट फक्त भारतात नाही तर परदेशात ही अॅमेझॉन प्राइमच्या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: I have made mistakes in each film of mine as a filmmaker said karan johar nrp