scorecardresearch

‘I Love Uddhav…’, महाराष्ट्राच्या राजकारणावर लकी अली यांची पोस्ट चर्चेत

लकी अली यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

lucky ali post on uddhav thackeray, uddhav thackeray,
लकी अली यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींपर्यंत काहींना यावर प्रतिक्रिया दिली. यासगळ्यात गायक लकी अलीने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. लकी अली यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

आणखी वाचा : “साहेब, तुमच्या यादीत महाराष्ट्र हित चौथ्या क्रमांकावर…”; सुमीत राघवनने एकनाथ शिंदेंच्या ट्वीटवर दिली प्रतिक्रिया

लकी अली यांनी फेसबूकवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिलं “आय लव्ह उद्धव, मी त्यांच्या राज्यकारभाराचा आदर करत आहे. विषय संपला.” या पोस्टमध्ये फुल स्टॉप असं म्हणतं त्यांनी यावर मला आणखी काही बोलायचं नाही, असं दाखवलं आहे.

आणखी वाचा : …म्हणून ‘धर्मवीर’ चित्रपटातील शेवटचा ‘तो’ सीन होतोय व्हायरल

ali post on uddhav thackeray, uddhav thackeray,
लकी अली यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर

गेल्या वर्षी लकी अली यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुंबई योग्य व्यक्तीच्या हातात असल्याचं त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळीही त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. आदित्य ठाकरे मला गाडीपर्यंत सोडायला आले, त्यांनी गाडीचा दरवाजा उघडून दिला म्हणजे ज्येष्ठांबद्दल त्यांचा आदर दिसून येतो, असंही अली म्हणाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: I love uddhav thackeray lucky ali on maharashtra politics dcp