इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी म्हणजेच आयफा (IIFA) पुरस्कार सोहळ्याची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. हा सोहळा गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या देशांमध्ये आयोजित करण्यात येतो. यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा अबू धाबी येथे दिमाखात पार पडला. यंदा या सोहळ्याचं २२वं वर्ष होतं. कलासृष्टीमधील मानाचा मानल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांना IIFA Awards 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्राजक्ता माळीला मिळाला निवांत वेळ, म्हणाली, “माझी काळजी नसावी लवकरच…”

Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Photos Out
पिवळी नऊवारी, सातफेरे अन्…; पूजा सावंतच्या लग्नाचा मराठमोळा थाट, अभिनेत्रीने शेअर केले विवाहसोहळ्यातील खास क्षण
Sangeet Natak Academy Award announced to veteran actor Ashok Saraf for his performance in the field of theatre
नाट्य क्षेत्रातील कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर
prathamesh parab wife kshitija ghosalkar special ukhana
“प्रेम आमचं खरंय, नाही थिल्लर ‘टाइमपास’…”, प्रथमेश परबच्या पत्नीचा भन्नाट उखाणा! म्हणाली, “अहोंसाठी…”

अभिनेता विकी कौशलपासून ते अगदी मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने यंदाच्या आयफा पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेहरशाह’ चित्रपटाने यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार पटकावला. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णु वर्धन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ‘सरदार उधम’ या चित्रपटासाठी अभिनेता विकी कौशला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर ‘मिमी’ या चित्रपटासाठी अभिनेती क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

आणखी वाचा – जबरदस्त प्रमोशन, देवदर्शन करुनही ‘सम्राट पृथ्वीराज’ला थंड प्रतिसाद, अक्षय कुमारच्या हाती निराशा

आयफा पुरस्कार सोहळ्याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे
सर्वोत्कृष्ट चित्रपट – शेरशाह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – विष्णु वर्धन (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – विकी कौशल (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – क्रिती सेनॉन (मिमी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (ल्युडो)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – सई ताम्हणकर (मिमी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता – अहान शेट्टी (अहान शेट्टी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री – शर्वरी वाघ (बंटी और बबली २)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – जुबिन नौटियाल रतन लंबियां (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – असीस कौर, रतन लंबियां (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट संगीत – ए आर रहमान (अतरंगी रे), तनिष्क बागची, जसलीन रॉयल, जावेद-मोहसीन, विक्रम मॉन्ट्रोसे, बी प्राक, जानी (शेहरशाह)

आणखी वाचा – VIDEO : चाहत्याने भेटवस्तू आणली अन्…; सलमानने केलं असं काही की नेटकरीही संतापले, पाहा हा व्हिडीओ

सलमान खान, शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, विकी कौशल तसेच स्टारकिड्समध्ये सारा अली खान, अनन्या पांडे यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी आयफामध्ये हजेरी लावली होती. यावेळी पुरस्कार विजेत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.