इलियाना डिक्रूज बॉयफ्रेंडसोबत फिजीमध्ये, पाहा बीचवरील हटके फोटो

अॅंड्र्यू स्वतः फोटोग्राफरच असल्याने त्याने इलियानाचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो टिपलेत.

Ileana D’Cruz
सुट्टीमध्ये करीत असलेल्या धम्मालमस्तीचे फोटो इलियाना आणि अॅंड्र्यू दोघेही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत आहेत.

अभिनेत्री इलियाना डिक्रूज सध्या फिजीमध्ये आपला बॉयफ्रेंड अॅंड्र्यू नीबोनसोबत सुट्टीवर आहे. अॅंड्र्यू हा मूळचा ऑस्ट्रेलियाचा राहणारा असून, तो व्यवसायाने फोटोग्राफर आहे. अभिनेता अक्षय कुमार यांच्या आगामी ‘रुस्तम’ चित्रपटामध्ये इलियाना त्याच्यासोबत दिसणार आहे. सुट्टीमध्ये करीत असलेल्या धम्मालमस्तीचे फोटो इलियाना आणि अॅंड्र्यू दोघेही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत आहेत.

The beginnings of an awesome tan 😛 Photo credit: my lovely @andrewkneebonephotography ❤️❤️❤️

A photo posted by Ileana D’Cruz (@ileana_official) on


अॅंड्र्यू स्वतः फोटोग्राफरच असल्याने त्याने इलियानाचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो टिपले असून, यामध्ये इलियानाचे वेगवेगळे मूड टिपण्यात आले आहेत. फोटोंमधून या दोघांची केमिस्ट्री खूप छान जमल्याचे जाणवते.


एका फोटोच्या कॅप्शनमध्ये इलियाना म्हणते, अॅंड्र्यू नीबोनसोबत एका सेक्सी बीचवरील दोन दिवस… बॉयफ्रेंडसोबतच्या रिलेशनशिपबद्दल इलियाना म्हणते, मला कोणतीही गोष्ट लपवून ठेवायला आवडत नाही. पण मला नात्यांबद्दल फार बोलायलाही आवडत नाही. व्यक्तिगत आयुष्यात आणखी एका व्यक्तीचाही सहभाग असतो, असे मला वाटते. आणि त्याच्यासोबत अन्याय होता कामा नये.

Lost in a moment with @ileana_official

A photo posted by Andrew Kneebone Photography (@andrewkneebonephotography) on

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ileana d cruz looks hottest ever as she holidays with boyfriend andrew kneebone see pic