scorecardresearch

‘एकच बिकिनी आहे का?’ व्हेकेशन फोटोंमुळे इलियाना डिक्रुझ झाली ट्रोल

इलियानं नुकत्याच शेअर केलेल्या बिकिनी फोटोंमुळे काही युझर्सनी तिची खिल्ली उडवली आहे.

ileana dcruz, ileana dcruz instagram, ileana dcruz bikini photos, ileana dcruz troll, इलियाना डिक्रुझ, इलियाना डिक्रुझ ट्रोल, इलियाना डिक्रुझ फोटो
इलियानानं तिच्या इन्स्टाग्रामवर मालदिव व्हेकेशनचे काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री इलियाना डिक्रुझ नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसते. नुकतेच इलियानानं तिच्या इन्स्टाग्रामवर मालदिव व्हेकेशनचे काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत. सध्या याच फोटोंमुळे इलियानाच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. इलियानाचा बिकिनी लुक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला असला तरीही काही युझर्सनी मात्र तिला यावरून ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये इलियाना व्हाइट कलरच्या स्ट्रॅपलेस बिकिनीमध्ये दिसत आहे. इलियानानं सनबाथ घेत असतानाचे तसेच स्विमिंग पूलमधील काही फोटो या पोस्टमध्ये शेअर केले आहे. इलियानाच्या याच फोटोंवरून नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. एवढंच नाही तर तिच्या फिगरवरूनही काही युझर्सनी तिच्या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.

एका युझरनं इलियानाच्या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, ‘तुझ्याकडे एकच बिकीनी आहे का?’ तर दुसऱ्या एका युझरनं इलियानाच्या बॉडी फिगरवरून कमेंट केली आहे. याशिवाय इलियानाच्या सातत्यानं बिकिनी फोटो शेअर करण्यावरही एका युझरनं आक्षेप घेतला आहे. त्यानं लिहिलं, ‘या मुलीला नक्की झालंय तरी काय. ती सतत बिकिनी फोटो शेअर करत आहे. न्यूडिटीबाबत एवढी जवळीकता वाटते का?’

दरम्यान अशाप्रकारे सोशल मीडिया पोस्टवरून किंवा लुकवरून ट्रोल होण्याची इलियानाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही इलियानाला बॉडी शेमिंगचा किंवा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र या सर्व गोष्टींचा माझ्यावर फारसा परिणाम होत नाही. असं तिने यापूर्वी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2021 at 12:25 IST

संबंधित बातम्या