scorecardresearch

‘कम्फर्ट नात्यांचा’मधून भरत जाधव आणि मयुरी देशमुख सांगणार बाप लेकीच्या नात्याची अनोखी गोष्ट

‘कम्फर्ट नात्यांचा’ या लघुपटात भरत जाधव, निवेदिता सराफ, यशोमन आपटे, मयूरी देशमुख, सुयश टिळक हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार आहेत.

'कम्फर्ट नात्यांचा'मधून भरत जाधव आणि मयुरी देशमुख सांगणार बाप लेकीच्या नात्याची अनोखी गोष्ट

काही लघुपट अतिशय कमी वेळात पूर्ण लांबीच्या चित्रपटांपेक्षाही प्रभावी संदेश देत मनामनांत घर करतात. नात्यांच्या धाग्यांची वीण जितकी घट्ट असते, तितकं ते नातं अधिक दृढ आणि विश्वासपात्र ठरतं. गुढीपाडव्यानिमित्त अशाच एका नाजूक नात्यांच्या प्रेमाची कथा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अद्भुत क्रिएटीव्हजच्या मोनिका धारणकर लिखित आणि वैभव पंडित दिग्दर्शित ‘कम्फर्ट नात्यांचा’ या लघुपटातून नात्यांची सांगड घालत एक महत्त्वपूर्ण मेसेज समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे.

कुटुंबातील नातेसंबंधात बाप लेकीच्या नात्याची बात काही औरच असते. अशी बाप लेकीची कथा ‘कम्फर्ट नात्यांचा’ या लघुपटात सांगण्यात आली आहे. मुलीसोबत आलेलं नवं नातं स्वीकार करताना वडीलांच्या मनातील भाव अत्यंत सुरेखपणे सादर करण्यात आले आहेत. दोन पिढ्यांमधला फरक विनोदी ढंगात मांडून इतर नात्यांचे पदर अलगद उलगडले आहेत.

मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा; संदीप पाठकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

या लघुपटाच्या निमित्तानं भरत जाधव आणि निवेदिता सराफ ही जोडी एकत्र आली आहे. इतकंच नाही तर सगळ्यांची लाडकी मयूरी देशमुख ही पण या लघुपटाचे आकर्षण आहे. भरत जाधव यांनी धमाल केली आहे तर निवेदिता यांनी सहज अभिनयाची छाप सोडली आहे.

या लघुपटात भरत जाधव, निवेदिता सराफ, यशोमन आपटे, मयूरी देशमुख, सुयश टिळक हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार आहेत. प्रत्येकाने आपापली भूमिका चोख बजावली आहे. ‘मद्रास कॅफे’, ‘लुका छिपी’ या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणारे मिलिंद जोग या लघुपटाचे डिओपी आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In comfort natyancha bharat jadhav and mayuri deshmukh will tell the unique story of father and daughter relationship pvp

ताज्या बातम्या