scorecardresearch

“आजकाल प्रत्येकजण बायकांसारखे…”, मलायकासोबतच्या नात्यावर ट्रोल होण्याबाबत अर्जुन कपूरने दिले सडेतोड उत्तर  

नुकतंच या ट्रोलिंगवर अर्जुन कपूरने सडेतोड उत्तर दिली आहेत.

बॉलिवूडमध्ये सध्याचे सर्वांचे लाडके कपल म्हणून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर ओळखले जातात. ते अनेकदा बाहेर एकत्र फिरताना, पार्टीला जाताना दिसतात. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. अनेकदा ते एकमेकांच्या फोटोवर कमेंट करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. यामुळे अनेकदा त्यांना ट्रोल केले जाते. नुकतंच या ट्रोलिंगवर अर्जुन कपूरने सडेतोड उत्तर दिली आहेत.

अर्जुन कपूरला एका मुलाखतीत मलायकावरुन होणाऱ्या ट्रोलिंगबाबत विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, “भारतातील लोकांना गॉसिप करणे फार आवडते. देशात आजकाल प्रत्येकजण सासू असल्याप्रमाणे किंवा बायकांसारखे वागत आहेत. त्यांना इतरांच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करणे आवडते. जर दोन लोकांना भविष्यात एकत्र यायचे असेल तर त्या जोडप्याचा आपण आदर करायला हवा.”

“अरुंधतीच्या आईला त्रास देण्याचे सिन लिहू नकोस नाहीतर…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

“अनेकदा मला असं वाटतं की जिथे एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याचा संबंध येतो, तेव्हा विविध अंदाज बांधण्याला काहीही अर्थ नसतो. आपल्याकडे सर्व लोकांना इतरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला आवडते. पण लोक तुमच्याबद्दल जितके जास्त बोलतात तितकेच तुमचे नाते आणखी मजबूत होते. जर तुम्ही एखादे नवे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचा सर्वात आधी सन्मान करा आणि बाहेर येऊन जगाला तुम्ही एकत्र आहात असे ओरडून सांगा. जेव्हा आम्ही एकत्र बाहेर पडतो, फिरतो, फोटो काढतो. त्यावेळी अनेकजण आमच्याबद्दल चांगलं वाईट लिहितात, बोलतात”, असेही अर्जुन कपूर म्हणाला.

मलायका आणि तुझ्या वयाच्या अंतरावरुन बरीच चर्चा होते, त्याबद्दल तुला काय वाटते? असा प्रश्न अर्जुनला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “आमच्या वयाच्या अंतराबाबत बोलणे हे लोकांचे मत आहे. लोकांना विविध गोष्टींवर मत मांडायला आवडते. देशात आजकाल प्रत्येकजण सासू असल्याप्रमाणे वागत आहे. लग्न कधी होणार? ते दोघे एकत्र चांगले दिसत नाहीत, यांचे रिलेशन वर्कआऊट होईल का? तिला त्याच्यात काय दिसते? त्यांचे करिअर संपुष्टात येईल? अशा विविध शंका लोक घेतात. त्यानंतर ते तुमच्या रिलेशनशिपबाबत अवघ्या २ मिनिटात न्याय करुन मोकळे होतात.”

“तिचा होकार अन् १ एप्रिलचा तो दिवस…”, दिग्दर्शक केदार शिंदेंनी सांगितला लग्नापूर्वीचा मजेशीर किस्सा

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर अर्जुन कपूर उत्तर देताना म्हणाला, “ट्रोलिंगचे हे दिवस हे आमच्यासाठी नरकासारखे होते. तिला इतका त्रास सहन करावा लागला की अखेरी आम्ही समोर येऊन मान्य करतो. पण मला आणि आमच्या नात्याला इतका आदर दिल्याबद्दल मी तिची (मलायका) प्रशंसा करतो.”

मलायका चित्रपटसृष्टीत सक्रीय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा १९ वर्षांचा झाल्यानंतर तिने अरबाज खान पासून घटस्फोट घेतला होता. १९९८ साली या दोघांनी लग्न केलं होतं आणि २०१७ साली ते दोघेही वेगळे झाले. त्यानंतर मलायका आणि अरबाज या दोघांनीही करिअरवर लक्ष केंद्रीत केलं. सध्या मलायका ही बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चाही सिनेसृष्टीत सुरु आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In india we love gossiping said arjun kapoor on comments about age gap with malaika arora nrp

ताज्या बातम्या