पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट गेल्या वर्षी म्हणजे ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता महाराष्ट्र सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

पानिपतचे तिसरे युद्ध होऊन अडीचशे वर्षे उलटली असली तरी ‘पानिपत’ हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हा विषय आशुतोष गोवारीकांनी अत्यंत भव्यदिव्य रुपात प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटात अर्जुन कपूरने सदाशिवराव भाऊ, क्रिती सनॉनने पार्वतीबाई आणि संजय दत्तने अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारली. याशिवाय चित्रपटात बरेच मराठी कलाकार देखील झळकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली.

‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ म्हणजे अहमद शाह अब्दाली व मराठ्यांमध्ये झालेले हे युद्ध. या युद्धातील मराठ्यांच्या शौर्याची गाथा महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकाने पहावी यासाठी महाराष्ट्र सरकारने चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला.