India Budget 2023-24 Live Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग पाचवा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने करदात्यांसाठी करपात्र रकमेत सूट देण्याची मोठी घोषणा केली आहे. आता सीतारमण यांनी ७ लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत. आधी टॅक्स स्लॅब सहाचे होते ते आता पाचवर करण्यात आले आहेत. याच निर्णयावर प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट केलं आहे. विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सामाजिक राजकीय मुद्यांवर ते कायमच भाष्य करत असतात. टॅक्स स्लॅबच्या निर्णयावर त्यांनी ट्वीट केलं आहे ज्यात त्यांनी लिहलं आहे की "स्लॅब ५ लाखावरून ७ लाख करण्याचा निर्णय शानदार आहे, वाह" अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे. Budget 2023: निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात सांगितल्या या ‘सात’ प्राथमिकता; ज्या देशाचा विकास घडवतील एकाने लिहले आहे 'हा काही योग्य निर्णय नाही', तर दुसऱ्याने लिहले आहे, 'जुनी कर प्रणाली आणि नवी कर प्रणाली यासारख्याच आहेत.' आणखीन एकाने लिहले आहे 'याने संशोधन केलेले दिसत नाही तसेही तो चित्रपटांचेदेखील करत नाही'. एकाने चक्क लिहले आहे की 'सामान्य लोकांना जीएसटीशी प्रॉब्लम आहे.' सध्या विवेक अग्निहोत्री त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटावर काम करत आहेत. हा विषय करोना काळातील लसीकरणाच्या मोहिमेसंदर्भात असल्याने या विषयाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२३ रोजी दर्शकांच्या भेटीला सज्ज झाला असून, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यासह १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.