इशा कोप्पीकरसंदर्भात इंदर कुमारच्या पहिल्या पत्नीने केला हा खुलासा

इंदर कुमार आणि सोनलच्या घटस्फोटामागचं कारण

inder kumar, isha koppikar
इंदर कुमार, इशा कोप्पीकर

बॉलिवूड अभिनेता इंदर कुमारचे २८ जुलै रोजी अंधेरी येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. त्याच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. आता इंदरची पहिली पत्नी सोनल करियाने त्याच्या नातेसंबंधाशी निगडीत खुलासा केलाय. इंदर कुमारची पूर्वाश्रमीची प्रेयसी इशा कोप्पीकरमुळेच दोघांचा घटस्फोट झाला असं सोनलने म्हटलंय. इतकंच नव्हे तर घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान तो इशाला विसरु शकत नव्हता असंही तिने सांगितलं.

एका वेबसाइटशी बोलताना सोनलने घटस्फोट होण्यामागचं कारण सांगितलं. सोनल म्हणाली की, ‘तो इशा कोप्पीकरला विसरु शकत नव्हता. पहिल्या प्रेमाला जसं कोणी विसरु शकत नाही, तसंच काहीसं इंदरसोबत झालं होतं. इशाला भेटायला जाताना तो मला सांगायचा. त्यावेळी मी अनेकदा त्याला म्हटलं की इशाला घरी बोलव, मात्र त्याने कधीच माझं ऐकलं नाही.’

वाचा : आता हेच बाकी होतं, ‘पिया’ आणि त्याची ‘पहरेदार’ जाणार हनिमूनला

‘घटस्फोटानंतरही इंदर इशाच्या संपर्कात होता असं मला वाटतं. यासंदर्भात तो मला कधीच काही सांगायचा नाही. तो तिला कधीच विसरु शकला नव्हता असं मला नेहमीच वाटायचं. लग्नापूर्वीही इशा आणि इंदरसंदर्भात मी विविध चर्चा ऐकल्या होत्या. मात्र त्यांकडे मी दुर्लक्ष केलं,’ असंही तिने पुढे म्हटलं. इंदर आणि सोनल यांच्या घटस्फोटामागचं कारण फक्त इशा कोप्पीकरच नाही तर इंदरची ड्रग्स आणि दारु पिण्याची सवयही होती, हेही तिने स्पष्ट केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Inder kumar first wife sonal kariya reveals he was in love with isha koppikar even after their divorce