“अरे याला कोणीतरी…”; मलायका अरोरा भर शो मध्ये वैतागली

सध्या मलायका ही ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोच्या दुसऱ्या पर्वात जजची भूमिका साकारत आहे.

malaika-arora
(Photo_instagram@malaikaaroraofficial)

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सिनेसृष्टीपासून लांब असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. ती अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड फोटोमुळे सतत चर्चेत असते. सध्या मलायका ही ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोच्या दुसऱ्या पर्वात जजची भूमिका साकारत आहे. या शो चे दुसरे पर्व अभिनेता मनीष पॉल होस्ट करत आहे. या शो मध्ये मनीष पॉल हा मलायकासोबत फ्लर्ट करण्याची एक संधी सोडताना दिसत नाही. नुकतंच या शो चा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मनीष पॉल हा मलायकाला सर्वांसमोर ‘हॉट’ बोलतो. यानंतर मलायका ‘याला कोणीतरी बांधून ठेवा’, असे गमतीत म्हणते.

हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला मनीष पॉल म्हणतो, “गरम वरुन लक्षात आलं, मलायका तू काय म्हणशील?” असा प्रश्न तिला विचारतो. यावर मलायका पटकन म्हणते, “मनीष चल डेटवर जाऊया”. यानंतर मनीष पटकन म्हणतो, “मलायका हॉट आहे याचा पुरावा माझ्याकडे आहे. यानंतर तो स्टेजवर बर्फाचा एक तुकडा ठेवतो आणि त्यानंतर तो सांगतो, की ज्या ठिकाणी मलायका बसली आहे त्या दिशेकडील बर्फाचा तुकडा बघा, तो वितळला आहे,” असे सांगत गमंत करतो. मनीषची ही मजा मस्ती ऐकून गीता कपूर आणि टेरेन्स लुईस जोरजोरात हसू लागतात.

यानंतर मनीष हा मलायकासाठी एक शायरी बोलतो. त्यात तो तिला ‘फटाका’ही बोलतो. “आता जो कोणी माझ्या आणि मलायकाच्या मध्ये येईल, त्याला मी उद्धवस्त करुन टाकेन,” असे म्हणतो. हे ऐकल्यानंतर मलायका म्हणते, “अरे याला कोणी तरी बांधून ठेवा किंवा घोड्यावर बसवून बाहेर पाठवून द्या,” असे ती गंमतीशीर पद्धतीने म्हणते. दरम्यान हा संपूर्ण एपिसोड येत्या आठवड्यात प्रदर्शित केला जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India best dancer season 2 mannish paul flirts with malaika arora video viral on social media nrp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या