scorecardresearch

“भारत देश हा फक्त कफ परेड आणि अंधेरीदरम्यान…”, सलमान खानचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

तामिळ किंवा तेलुगू भाषिक चित्रपटांच्या ऑफर माझ्याकडे येत नाही, असे सलमानने स्पष्ट केले.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा सध्या त्याच्या आगामी टायगर ३ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान खान हा त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. तो अनेकदा त्याचे चित्रपट, बॉलिवूड, सिनेसृष्टीत याबद्दल वक्तव्य करतो. त्याची ही वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच सलमान खानने हिंदी सिनेसृष्टीच्या बदलत्या स्वरुपावर भाष्य केले आहे.

काही दिवसांपूर्वी सलमानने मुंबईत एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी सलमान खानला सिनेसृष्टीच्या बदलत्या स्वरुपाविषयी विविध प्रश्न विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना सलमान म्हणाला, “ज्यांना असं वाटतं की भारत देश हा फक्त कफ परेड आणि अंधेरीदरम्यान आहे, त्यांनी खरा भारत समजून घेणे गरजेचे आहे. जोपर्यंत या लोकांना खरा भारत समजत नाही, तोपर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये खरा भारत देश कसा दिसेल?”

प्रसिद्ध गायकाने बूट घालून केले हनुमान चालिसावर नृत्य, वादावर स्पष्टीकरण देत म्हणाला “आम्ही…”

“कफ परेड हे दक्षिण मुंबईतील एक सुसज्ज असे ठिकाण आहे. तर अंधेरी हे आजकाल हिंदी चित्रपट निर्मितीचे मुख्य केंद्र बनले आहे”, असेही सलमान म्हणाला. दरम्यान सलमानने केलेले हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे.

दाक्षिणात्य चित्रपटातील ऑफरबद्दलही खुलासा

दरम्यान यावेळी सलमानने दाक्षिणात्य चित्रपटातील ऑफरबद्दलही खुलासा केला. मला दाक्षिणात्य चित्रपट आवडतात. पण अद्याप मला कोणत्याही चित्रपटाची ऑफर आलेली नाही. अनेकदा जेव्हा निर्माते, दिग्दर्शक माझ्याकडे येतात तेव्हा ते हिंदी चित्रपटांची ऑफर घेऊन येतात. तामिळ किंवा तेलुगू भाषिक चित्रपटांच्या ऑफर माझ्याकडे येत नाही, असे सलमानने स्पष्ट केले.

“अमृता तू माझ्यासाठी एखादी स्टार नाहीस तर…”, अंकिता लोखंडेने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

सलमान खान आणि कतरिना कैफ हा ‘टायगर ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘टायगर ३’ हा चित्रपट टायगरच्या अॅक्शन चित्रपटांच्या मालिकेतील आहे. ‘टायगर ३’ या चित्रपटाचे शूटींग हे १४ फेब्रुवारीपासून दिल्लीत सुरु झाले. याचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.

‘टायगर ३’ यात सलमान पुन्हा एकदा रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसेल. तर कतरिना यात आयएसआय एजंट झोयाची भूमिका साकारणार आहे. यात आभिनेता इमरान हाशमी खलनायकेच्या भूमिकेत दिसेल. याआधी सलमान आणि कतरिनाने अली अब्बास जाफरच्या ‘भारत’या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India does not live between cuff parade and andheri said salman khan during interview nrp

ताज्या बातम्या