Indian idol 12 : शन्मुखप्रियाचे कौतुक केल्यामुळे जावेद अख्तर झाले ट्रोल

इंडियन आयडल १२”जावेद अख्तर” स्पेशल भागात शन्मुखप्रियाच्या गायकिचे कौतुक केल्यामुळे जावेद अख्तर यांना करावा लागला ट्रोलिंगचा सामना.

javed-akhtar-indian-idol-got-trolled-Shanmukhpriya
(Photo-indianexpress, instagram)

छोट्या पडद्यावरील ‘इंडियन आयडल १२’ हा सिंगिंग रिअॅलिटी शो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. इंडियन आयडल १२ मधील एका भागात गीतकार जावेद अख्तर यांनी हजेरी लावली होती. त्या भागात सगळ्या स्पर्धकांनी जावेद अख्तर यांची गाणी गायिली. जावेद यांनी त्यांच्या प्रत्येक गाण्यामागची कहाणी सांगितली आहे. दरम्यान, जावेद यांनी स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले. पण जेव्हा त्यांनी स्पर्धक शन्मुखप्रियाचे कौतुक केले त्यावेळी जावेद अख्तर यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.

शन्मुखप्रियाचे गाणे उत्तम असल्याचे जावेद यांनी सांगितले. ते म्हणाले ‘आत्तापर्यंत मी शन्मुखप्रियाचे यूट्यूबवर बरेच परफॉर्मन्स पाहिले. पण आज तिला परफॉर्म करताना लाइव्ह पाहिलं. असच काम करत रहा, भविष्यात खूप पुढे जाशील.’ या नंतर शन्मुखप्रियाने देखील आपले मत व्यक्त केले. तिला जावेद अख्तर यांच्यासमोर गाण्याची संधी दिल्याबद्दल तिने इंडियन आयडलचे आभार मानले.आणि त्यांच्या कडून कौतुकाची थाप मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे असे ही तिने सांगितले.


शन्मुखप्रियाचे केलेले कौतुक मात्र काही नेटकऱ्यांना पटले नाही असे दिसून येत आहे. नेटकऱ्यांनी जावेद अख्तर यांना ट्रोल केले. #indianidol12 worstseason हा हॅशटॅग सोशल मीडीयावर ट्रेंड होताना दिसून आला. काही यूजर्सने तर #skipindianidol असा नारा सोशल मीडियावर लावल्याचे दिसून येत आहे. एका यूजरने ट्वीट करत ‘शन्मुखप्रियाचे चाहते वेडे आहेत’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने शोचे परीक्षक देखील वेडे असल्याचे म्हटले आहे.

इंडियन आयडल १२चा सूत्रसंचालक आदित्य नारायणने जावेद यांना म्हणाला की ‘मला तुमच्या सोबत कॉनसर्ट करायला आवडेल.’ पुढे त्याने शन्मुखप्रियाबरोबर लॉकडाउन संपल्यावर कॉनसर्ट करण्याची इच्छादेखील व्यक्त केली. इंडियन आयडल १२ मध्ये शन्मुखप्रिया बरोबर दानिश मोहम्मद, अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, आशिष कुलकर्णी, निहाल टॉरो हे देखील स्पर्धक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian idol 12 judge javed akhtar got trolled for over parsing this contestant avb 95 add

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या