षण्मुखप्रियाला इंडियन आयडलमधून बाहेर काढण्याची होत आहे मागणी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने दिला पाठिंबा

SIIMAचे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

(Photo Credit : Shanmukhapriya Instagram)

छोट्या पडद्यावरील सिंगिग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’ हा लोकप्रिय रिअॅलिटी शोपैकी एक आहे. इंडियन आयडलचे हे १२ वे पर्व सुरू आहे. हा शो सुरु झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. दरम्यान, काही दिवसांपासून षण्मुखप्रियाला शोमधून काढून टाकण्याची मागणी केली जात होती. आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने षण्मुखप्रियाला सोशल मीडियावर एक पोस्ट करत पाठिंबा दिला आहे.

‘सिमा’ म्हणजेच दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने त्यांच्या अधिकृत ट्विटवरून एक ट्वीट केले. या ट्वीटद्वारे षण्मुखप्रिया हिला SIIMAने पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. “विशाखापट्टणममधील षण्मुखप्रिया ही एक प्रतिभावान गायिका आहे. षण्मुखप्रियाने यंदाच्या इंडियन आयडलमध्ये तिच्या परफॉमन्सने सगळ्यांची मने जिंकली आहेत, अशा आशयाचे ट्वीट केले. एवढचं नाही तर त्यांनी आणखी एक ट्वीट केले आहे.

पुढे त्यांनी आणखी एक ट्वीट केले. “या १८ वर्षांच्या मुलीने तिच्या परफॉमन्सने परिक्षक आणि प्रेक्षकांची मने जिकंली आहेत. यंदाच्या पर्वात ‘इंडियन आयडल’ची ट्रॉफी जिंकणाऱ्यांच्या शर्यतीत ती आहे. चला तर तिला पाठिंबा देऊया,” अशा आशयाचे ट्वीट करत त्यांनी षण्मुखप्रियाला पाठिंबा दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shanmukhapriya (@shanmukhapriya_1925)

किशोर कुमार स्पेशल एपिसोडपासून ‘इंडियन आयडल’चे चाहते षण्मुखप्रियाला ट्रोल करत आहेत. तरीही, ती या सगळ्याकडे दुर्लक्ष करतं पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अशा कठीण प्रसंगात दक्षिण चित्रपटसृष्टीने पुढे येऊन तिला पाठिंबा दिला आहे.

आणखी वाचा : …म्हणून करण जोहरने तीन वेळा माझ्याशी लग्न करण्यास दिला नकार, नेहा धुपियाने केला खुलासा

SIIMA ही दक्षिणची एक मोठी संस्था आहे, ज्यांचे पुरस्कार तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि संपूर्ण दक्षिण भारतीय सिनेमाचे प्रतिनिधित्व करतात.

आणखी वाचा : संजय दत्तच्या नावाचं सिंदूर लावतात रेखा?

षण्मुखप्रियाला साऊथ इंडस्ट्रीकडून पाठिंबा मिळत असला, तरीदेखील तिला शोमधून बाहेर काढण्याची मागणी ही सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी तिने एक मुलाखत दिली होती, ज्यात तिने म्हटले होते की, मायकल जॅक्सनला देखील अशा प्रकारे लोकांनी टीका केल्या होत्या. मायकल जॅक्सनशी स्वत: ची तुलना केल्याने षण्मुळप्रिया सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian idol 12 shanmukhapriya supported by siima amid audience demands her elimination dcp

ताज्या बातम्या