Indian Idol 12: सुप्रसिद्द अभिनेत्री रीना रॉयने केला अनु मलिकच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा

‘इंडियन आयडल 12’च्या सेटवर अभिनेत्री रीना रॉय यांनी अनेक खुलासे केले आहेत. हे ऐकून सेटवरील प्रत्येक प्रेक्षक आणि स्पर्धकसुद्धा हैराण झाले.

reena-roy-anu-amlik

सोनी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल 12’च्या पुढच्या एपिसोडमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉय दिसणार आहेत. या एपिसोडमध्ये सर्व स्पर्धक रीना रॉय यांचे सुपरहिट गाणे सादर करताना दिसून आले. यावेळी अरुणिता कांजीलाल हिने रीना रॉय यांचं सुपरहिट गाणं ‘शीशा हो या दिल हो’ हे गाणं सादर केलं. तिच्या या परफॉर्मन्सने रीना रॉय खूपच इम्प्रेस झाल्या. याचवेळी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील जुन्या आठवणी शेअर केल्या. इतकंच नव्हे तर अनु मलिकच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केलाय. त्यांचं घर असलेल्या गल्लीत अनु मलिक अनेकदा फेऱ्या मारत असायचे असं देखील सांगितलं.

या शोमध्ये रीना रॉय यांनी केलेला हा खुलासा ऐकून अनु मलिक सुद्धा आश्चर्य झाले. यावेळी रीना रॉय म्हणाल्या, “आम्ही राहत असलेल्या परिसरात जी सगळ्यात जास्त सभ्य मुली म्हणून ओळखली जात होती तिच्यासोबत ते पळून गेले होते आणि दोघांनी लग्न सुद्धा केलं.

” रीना रॉय यांचा हा खुलासा ऐकून सेटवरील सगळे प्रेक्षक, स्पर्धक तसंच होस्ट आदित्य नारायण सुद्धा हैराण झाला. हे ऐकून आदित्य नारायण प्रतिक्रिया देताना म्हणाला, “12 वर्षानंतर आमच्या शो च्या टीमला म्यूजिक कम्पोजर अनु मलिक यांच्याबाबतीत ही गोष्ट कळली.”

या एपिसोडमध्ये रीना रॉय त्यांच्या सुपरहिट गाण्यांना पुन्हा एकदा एन्जॉय करताना दिसून आल्या. ‘इंडियन आयडल 12’ चा फिनाले सुद्धा जवळ आलाय. यासाठी शो चे मेकर्स जोरदार तयारी करत आहेत. प्रेक्षक सुद्धा आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकताना पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. त्यामुळे आता या शो मध्ये नक्की कोण विजेता ठरणारे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian idol 12 veteran actress reena roy reveals a huge secret about anu malik life prp

फोटो गॅलरी