scorecardresearch

Video : “वय निघून गेल्यावर…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंत आता कसा दिसतो? पाहा व्हिडीओ

नुकतंच त्याने एक भावूक व्हिडीओ शेअर केला आहे.

abhijeet sawant video
अभिजीत सावंतने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

‘मोहब्बतें लुटाऊंगा’ हे गाणं ऐकताच क्षणी आपल्या डोळ्यासमोर लोकप्रिय गायक अभिजीत सावंतचे नाव येते. या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिजीत सावंत आजही अनेकांच्या लक्षात आहे. ‘इंडियन आयडल’ या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या रिअॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचला. नुकतंच त्याने एक भावूक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

‘इंडियन आयडल’चे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. त्याच्यासाठी हा प्रवास फार कठीण होता. ‘इंडियन आयडल’चे पहिले पर्व जिंकल्यानंतर अभिजीत मात्र सिनेसृष्टीतून गायब झाला. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने आयुष्यावर आधारित एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
आणखी वाचा : “आर्थिक मंदीदरम्यान…” ‘इंडियन आयडल’ जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांबद्दल अभिजीत सावंतने केला खुलासा

या व्हिडीओत तो गाडीतून फिरत असल्याचे दिसत आहे. तसेच त्याने केलेली मजा-मस्तीही त्याने यानिमित्ताने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला एक भावूक आवाज पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : “पण माझ्या डोक्यात हवा…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंत स्पष्टच बोलला

“जेव्हा तुमचे वय निघून जाईल, तेव्हा समजेल की आयुष्य होते, जगायचे होते, पण राहून गेले. तुम्ही पैसे कमवा, खूप कमवा, तुम्हाला कोणी थांबवलं आहे. पण तो कमावताना स्वत:ला विसरुन जाणं, हे तर योग्य नाही. त्यामुळे जरा स्वत:साठी गुंतवणूक करा आणि स्वत:वरही खर्च करा”, असा आवाज या व्हिडीओत ऐकायला मिळत आहे.

या व्हिडीओला अभिजीतने हटके कॅप्शन दिले आहे. “मला असे काहीसे आयुष्य जगायचे आहे”, असे त्याने कॅप्शन देताना म्हटले आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी ‘अगदी खरंय’, ‘खूपच छान’ अशा कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 20:22 IST

संबंधित बातम्या