scorecardresearch

महाराष्ट्राला मिळाला ‘इंडियन आयडल मराठी’ च्या पहिल्या पर्वाचा विजेता, पनवेलच्या सागर म्हात्रेने कोरले ट्रॉफीवर नाव

‘गाडीवान दादा’ असं टोपणनाव त्याला पडले होते.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून इंडियन आयडलला ओळखले जाते. या शोच्या मंचावर अनेकांना आपल्या सुरेल आवाजाने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी दिली आहे. ‘इंडियन आयडल’ या शोमुळे अनेकांचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. ‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ अशी या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे. नुकतंच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या कार्यक्रमात पनवेलचा सागर म्हात्रे विजेता ठरला आहे.

‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक सहभागी झाले होते. या महापर्वाच्या महाअंतिम सोहळ्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. काही दिवसांपूर्वी यातील टॉप ५ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. मात्र विजेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. नुकतंच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला.

अखेर प्रतिक्षा संपली! अवघ्या काही तासात प्रदर्शित होणार ‘चंद्रमुखी’चा ट्रेलर

इंडियन आयडलमध्ये जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले होते. त्यातील पनवेलचा सागर म्हात्रे विजेता ठरला आहे. सागरच्या आवाजाने रसिकांच्या मनात घर केलं आहे.

सागर म्हात्रे हा पेशाने इंजिनियर आहे. तरीही त्याच्या गोड गळ्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. ‘गाडीवान दादा’ असं टोपणनाव त्याला पडले होते. सागरने अंतिम फेरीत विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेत टॉप १४ स्पर्धकांमध्ये निवड झाल्यानंतर सागरने विविध प्रकारची गाणी गाऊन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोनी राजदानने शेअर केला महेश भट्ट यांच्यासोबतचा थ्रोबॅक फोटो, म्हणाल्या “आमच्या लग्नाला…”

मेहनत, जिद्द, रियाज या जोरावर परिक्षकांची त्याने व्हा व्हा मिळवली. तसेच तब्बल ८ वेळा त्याला ‘झिंगाट परफॉर्मन्स’ मिळाले आहेत. सागरने हिंदी, मराठी सर्वप्रकारची गाणी गायली आहेत. दर आठवड्याला येणाऱ्या पाहुण्यांच्या कौतुकासही सागर पात्र ठरला. त्यानंतर आता ‘इंडियन आयडल मराठी’ च्या चमचमत्या ट्रॉफीवर सागरने अखेरीस स्वतःचं नाव कोरले. परीक्षक अजय अतुल यांच्याकडून सागरला ट्रॉफी बहाल करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian idol marathi grand finale sagar mhatre became the winner lifts the trophy of the first season nrp

ताज्या बातम्या