scorecardresearch

‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर गायक आनंद शिंदे यांनी प्रतीकला आशीर्वाद म्हणून दिली ‘ही’ भेटवस्तू

अजय-अतुल सध्या या ‘इंडियन आयडल मराठी’चे परिक्षक आहेत.

indian idol marathi, pratik solase, anand shinde,
अजय-अतुल सध्या या 'इंडियन आयडल मराठी'चे परिक्षक आहेत.

‘इंडियन आयडल मराठी’ हा रिअॅलिटी शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. शोमध्ये प्रतीक सोळसे या स्पर्धकाने पहिल्या शोपासूनच प्रेक्षकांबरोबरच परिक्षक अजय-अतुल यांच्याही मनात विशेश स्थान निर्माण केलं आहे. प्रतीक हा ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांचा खूप मोठा चाहता आहे. तर आगामी भागात अजय-अतुल यांनी वचन दिल्याप्रमाणे ते प्रतीकची भेट प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्याशी घडवून आणल्याने प्रतीकची स्वप्नपूर्ती झाली आहे. तर याच मंचावर या अनोख्या गुरु-शिष्यांचं एकत्र सादरीकरणही बघायला मिळणार आहे.

आता आगामी भाग हा लोकसंगीत विशेष असणार आहे. या भागात प्रसिद्ध गायक आनंद शिंदे उपस्थित राहणार आहेत. आनंद शिंदे यांनी आल्याआल्या ‘मी केवळ प्रतीकला भेटण्यासाठी आलो आहे’ असं जाहीर केल्यानं प्रतीकचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. त्या वेळी अजय-अतुल यांनी आनंद शिंदे यांना सांगितलं की, ‘तुमची ही भेट प्रतीकच्या आयुष्यभर लक्षात राहील अशी काहीतरी आठवण त्याला द्या.’ यावर आनंद शिंदे यांनी स्वत:च्या हातातलं घड्याळ काढून देत सांगितलं की, ‘प्रतीक माझा एकलव्यासारखा शिष्य आहे. या घड्याळामुळे प्रतीकच्या आयुष्यातली चांगली वेळ आता सुरू होईल.’

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

आणखी वाचा : पुष्पाची एण्ट्री होताच श्रेयस तळपदेला आली चक्कर, पाहा Video

त्यानंतर आनंद शिंदे गाणं सादर करत असताना त्यांनी प्रतीकला त्यांच्याबरोबर गाण्यासाठी स्वत:हून बोलावून घेतलं. त्यामुळे ‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर प्रतीकचं गुरूबरोबर गाण्याचं स्वप्न खर्‍या अर्थानं पूर्ण झालं, असं म्हणता येईल. या भागात स्पर्धक विविध प्रकारची लोकगीतं सादर करणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian idol marathi pratik solase gets gift from anand shinde dcp

ताज्या बातम्या