scorecardresearch

‘इंडियन आयडल मराठी’च्या ‘या’ ५ स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी रंगणार सुरांची टक्कर!

विजेतेपदासाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळणार आहे.

indian idol marathi,
विजेतेपदासाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळणार आहे.

‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आले होते. त्यातून नुकतेच महाराष्ट्राला टॉप ५ स्पर्धक मिळाले आहेत. विजेतेपदासाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले आहेत. पहिल्यांदाच मराठी भाषेत! ‘इंडियन आयडल’ सुरू झालं आणि देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल यांनी महाराष्ट्रासाठी आवाज शोधण्याचं कार्य हाती घेतलं.

नाशिक जिल्ह्यातला निफाडचा जगदिश आणि दिंडोरीचा प्रतिक, पनवेलचा सागर, वसईची श्वेता आणि नागपूरची भाग्यश्री टिकले या स्पर्धकांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर, परीक्षकांच्या गुणांनी आणि प्रेक्षकांच्या मताच्या आधारे टॉप ५ मध्ये बाजी मारली आहे. या स्पर्धकांमध्ये स्पर्धा चांगलीच रंगत आहे. प्रत्येकाची आवाजाची शैली, सादरीकरणाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. टॉप १४ मधून बाजी मारलेल्या या शिलेदारांनी रसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. संपूर्ण पर्वात अनेक पाहुणे आले आणि त्यांनी स्पर्धकांना मोलाचं मार्गदर्शन केलं. अजय-अतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक असल्याने ही ५ रत्नं महाअंतिम फेरीत एकमेकांशी लढणार आहेत.

आणखी वाचा : अनुष्का शर्मा मराठमोळ्या जेवणाच्या प्रेमात, फोटो शेअर करत म्हणाली…

आणखी वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला शरद पवार यांचा ‘सिल्व्हर ओक’ बंगला आतून कसा दिसतो, पाहा फोटो

आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोचली आहे. लवकरच ‘इंडियन आयडल मराठी’ पर्वाचा विजेता किंवा विजेती महाराष्ट्राला मिळणार आहे. विजेतेपदासाठी सुरू असलेली चुरस, अनुभवण्यासाठी पाहत राहा, ‘इंडियन आयडल मराठी’, सोम.-बुध., रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian idol marathi this 5 contender will fight for the trophy dcp

ताज्या बातम्या