मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. विद्याधर करमरकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यासोबत अनेक जाहिरातीतही ते झळकले होते. आबा म्हणून त्यांना संपूर्ण सिनेसृष्टीत ओळखले जायचे. ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’या जाहिरातीतील ‘अलार्म काका’ म्हणून ते फार प्रसिद्ध होते.

विद्याधर करमरकर यांनी आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’ , ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे. अनेक हिंदी चित्रपटात ते वडील किंवा आजोबांच्या भूमिकेत पाहायला मिळायचे. फक्त चित्रपट नव्हे तर त्यांच्या जाहिरातीही प्रचंड गाजल्या.

Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
how much Rihanna charges to perform at a private event (1)
रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म
Inspection of records in land records office by police in case of arrest of KDMC urban planning staff
कडोंमपा नगररचना कर्मचारी अटक प्रकरणात पोलिसांकडून भूमि अभिलेख कार्यालयातील अभिलेखांची तपासणी

दरवर्षी दिवाळीदरम्यान टीव्हीवर प्रसिद्ध होणारी ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ ही मोती साबणाच्या जाहिरातीत ते झळकले होते. त्यात त्यांनी ‘अलार्म काकां’ची भूमिका साकारली होती. यासोबतच इंडियन ऑइल, पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, लिनोवो कंप्युटर्स, एशियन पेंट यासारख्या जाहिरातीत त्यांनी काम केलं आहे.

विद्याधर करमरकर यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने अनेक कलाकारांना धक्का बसला आहे. ते मुंबईतील विलेपार्ले या ठिकाणी राहत होते. त्यांनी सुरुवातीला नोकरी करुन अभिनयाची आवड जोपासली. त्यानंतर अनेक नाटकांमध्येही त्यांनी काम केले. त्यासोबत काही चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.