भारत हा जगातील आघाडीच्या विकसनशील देशांपैकी एक आहे. शेतीपासून मनोरंजनापर्यंत, प्रत्येक क्षेत्रात आपला देश वेगाने प्रगती करत आहे. भारतात नुकतंच चेन्नईच्या विमानतळावर पहिले मल्टिप्लेक्स उभं करण्यात आलं आहे. हे वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही बातमी अगदी खरी आहे. ‘PVR Aerohub’ नावाचा ‘ऑन द गो’ सिनेमा हॉल विमानतळाच्या परिसरात उभारण्यात आला आहे. सध्या याचीच चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेन्नई विमानतळावरील पहिल्या मल्टिप्लेक्सबद्दल माहिती शेअर करताना, चेन्नई विमानतळाच्या अधिकृत ट्विटर हँडलने पोस्ट करत लिहिले की, “चेन्नई विमानतळ आता तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. ईस्ट एमएलसीपी बिल्डिंगमध्ये हे नवं थिएटर उभारण्यात आलं आहे. लोकांचा प्रवास सुखकर व्हावा आणि तो त्यांच्या स्मरणात राहावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”

आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’मधील ‘ही’ बिनधास्त अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडिया पोस्टमधून खुलासा

एवढंच नव्हे तर या मल्टिप्लेक्सचे फोटोजसुद्धा या पोस्टमध्ये शेअर करण्यात आले आहेत. बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, चित्रपटगृहाची आसन क्षमता ११५५ असेल. यामध्ये RealD 3D, डिजिटल स्टिरिओस्कोपिक प्रोजेक्शन आणि डॉल्बी अॅटमॉस हाय-डेफिनिशन इमर्सिव्ह ऑडिओसह नवीन तंत्रज्ञानाचादेखील समावेश करण्यात आला आहे. हे थिएटर सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजे प्रवासी त्यांच्या लेओव्हरच्या वेळेत चित्रपटगृहात चित्रपट पाहू शकतात आणि वेळ घालवू शकतात.

एकूणच ही संकल्पना उत्तम असून येत्या काही वर्षात आणखी वेगवेगळ्या विमानतळावर अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल याकडेसुद्धा लक्षकेंद्रित करण्यात येत आहे. ‘पीव्हीआर’च्या अध्यक्षांनीसुद्धा या प्रोजेक्टसाठी उत्सुकता दर्शवली असून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ते काय तत्पर असतात असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias first airport pvr multiplex is now open for entertainment at chennai airport avn
First published on: 02-02-2023 at 16:53 IST