‘इंडियाज गॉट टॅलेंट’चा प्रत्येक नव्या प्रोमोमध्ये कलाकारांचं टॅलेंट पाहायला मिळतं. मागच्या काही एपिसोडमध्ये कोणी ड्रिलिंग मशिननं स्वतःला हार्म करताना दिसले. तर कोणी स्वतःलाच आग लावून दाखवलं. पण आता या शोमध्ये असंच काहीसं घडलं. एका स्पर्धकानं असं काही केलं की शोच्या परीक्षक किरण खेर यांचा पारच चढला. त्यांनी रिजेक्शनचा बझर वाजवत त्या स्पर्धकाला शोमधून बाहेर जाण्यास सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच प्रसारित झालेल्या या प्रोमोमध्ये एक मनिष नावाचा स्पर्धक रंगीत ज्यूसच्या बॉटल्स घेऊन येतो. जे पाहिल्यानंतर सर्वजण हैराण होतात. मनिष नेमकं काय करणार याचा विचार ते करतात. तेवढ्यात शोचा परीक्षक बादशाह त्याला याची किंमत विचारतो. तर मनिष २०० रुपये एवढी किंमत असल्याचं सांगतो. ज्यूस एवढा महाग आहे हे ऐकल्यानंतर सर्वच परीक्षक हैराण होतात. जेव्हा हा ज्यूस एवढा महाग का आहे असं बादशाह त्याला विचारतो तेव्हा मनिष सांगतो की, ‘मी कोलाचं पाणी वेगळ्या पद्धतीने तयार करतो.’ त्यानंतर तो आपलं टॅलेंट दाखवायला सुरुवात करतो.

आपलं टॅलेंट दाखवत असताना तो काचेच्या ग्लासमध्ये लाल आणि काळ्या रंगाचं पाणी भरुन घेतो आणि एका मागोमाग एक ते पाणी तो पितो. पण त्यानंतर तो जे काही करतो ते सर्वांनाच हैराण करणारं होतं. मनिष पहिल्यांदा आपल्या तोंडावाटे हिरव्या रंगाचं पाणी बाहेर काढतो तर दुसऱ्या वेळी तो लाल रंगाचं पाणी काढतो. जे पाहिल्यावर सर्वांनाच या सगळ्याची किळस वाटते. एवढंच नाही तर परीक्षक किरण खेर यांच्या रागाचा तर पाराच चढतो. त्या लगेचच रिजेक्शनचा बझर वाजवून त्याला थांबवतात.

किरण खेर रागात त्याला सांगतात, ‘एवढा वेळ इथे बसून आम्ही तुझ्या हिरव्या, लाल, निळ्या उलट्या पाहू शकत नाही. २०० रुपयात तू उलटी विकत आहेस आणि तेही सूट-बूट घालून. पंजाबीमध्ये याला म्हणतात- ‘दूर फिटे मुंह’ किरण खेर यांचं बोलणं ऐकून शिल्पा शेट्टी, मनोज मुंतशिर आणि बादशाह हसू लागतात आणि मनिष तिथून निघून जातो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias got talent kirron kher got angry on contestant video goes viral mrj
First published on: 26-01-2022 at 16:41 IST