सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे बॉलिवूड स्टार रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटची. अनेकांनी रणवीरच्या या न्यूड फोटोशूटचं कौतुक केलंय. तर काही नेटकरी मात्र त्याला ट्रोल करत आहेत. अनेक स्तरातून रणवीर टीका करण्यात आली, एवढंच नाही तर मुंबईतील एका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. तर देशात अनेक ठिकाणी रणवीरच्या या फोटोशूट विरोधात निदर्शनं करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणवीर सिंगने ‘पेपर’ या इंग्रजी मासिकासाठी केलेल्या या न्यूड फोटोशूट विरोधात नुकतच इंदौरमध्ये अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. इंदौरमध्ये एका सामाजिक संस्थेकडून या न्यूड फोटोशूटच्या निषेधार्थ कपडे दान मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरातील ‘मानवतेची भिंत’ या ठिकाणी रणवीर सिंगचं न्यूड फोटोचं फलक लावण्यात आलं. अनेकांनी इथे त्याच्यासाठी कपडे दान केले. “मेरे इंदौरने ठाना है, देश से मानसिक कचरा भी हटाना है” असं या फलकावर लिहिण्यात आलं होतं. तरु दुसरीकडे “बॉलिवूड संकटात, मानसिक कचरा” असं लिहिण्यात आलं होतं.

हे देखील वाचा: तब्बल तीन तास कपड्यांशिवाय होता रणवीर, फोटोग्राफरनं सांगितलं कसं झालं शूटिंग

रणवीरचं हे कृत्य म्हणजे महिलांचा अनादर करणं आहे असा आरोप या सामाजिक संस्थेने केला. तसचं रणवीर सिंगचा लोकप्रियता मिळवण्यासाठीचा हा मार्ग योग्य नसून याचा तरुणांवर आणि लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होवू शकतो असाही आरोप यावेळी करण्यात आला. अनेक तरुण रणवीर सिंगचे चाहते आहेत. रणवीरचं हे कृत्य त्यांच्या मनावर वाईट परिणाम करणारं आहे असं म्हणत यावेळी कपडे दान करण्याची मोहिम राबवण्यात आली. यावेळी शहरातील अनेक नागरिकांनी कपडे दान केले.

हे देखील वाचा: सेम टू सेम! रणवीरप्रमाणेच अभिनेता नकुल मेहताचं न्यूड फोटोशूट, पत्नी म्हणाली “आधी कपडे घाल”

रणवीर सिंग विरोधात गुन्हा दाखल

दरम्यान चेंबूर परिसरातील एका सामाजिक संस्थेचे ललित टेकचंदानी यांनी या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सकाळी रणवीर सिंहविरोधात भादंवि कलम २९२, २९३, ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवला़ भारताला चांगली संस्कृती लाभली असून, या छायाचित्रामुळे महिलांसह सर्वाच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारदाराने केला आह़े

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indore based ngo organised clothes donation drive in protest of ranveer singh recent nude photoshoot kpw
First published on: 27-07-2022 at 19:31 IST