Anant Ambani- Radhika Merchant Wedding: प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर काव्या कर्नाटक (Kavya Karnatac) ही भारतातील लोकप्रिय एज्युकेशनल इन्फ्लुएन्सर आहे. काव्याचे फक्त १० महिन्यांत इन्स्टाग्रामवर १० लाखांहून जास्त फॉलोअर्स झाले आहेत. सध्या काव्या तिच्या कंटेंटमुळे नाही तर तिला अंबानींकडून मिळालेल्या ऑफरमुळे चर्चेत आहे. काव्याने तिच्या लिंक्डइनवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. तिला अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नासाठी ३.६ लाख रुपयांची ऑफर मिळाली होती. पण तिने ही ऑफर नाकारली व त्यामागचं कारणही सांगितलं. काव्या कर्नाटकने अनंत-राधिकाच्या लग्नाबद्दल केलेली पोस्ट पोस्टमध्ये काव्याने लिहिलं, "मला अंबानींच्या लग्नातील गर्दीत सहभागी व्हायचं नव्हतं. कारण तिथे जाऊन मला माझ्या कंटेंट आणि ब्रँडशी तडजोड करायची नव्हती. जिओने रिचार्ज प्लॅनचे पैसे वाढवल्यावर मला अंबानीसारख्या कॉर्पोरेट दिग्गज कंपनीला पाठिंबा द्यावा असं वाटलं नाही. मला माझ्या चाहत्यांशी प्रामाणिक राहायचं होतं व या लग्नाचे प्रमोशन करून मला त्यांचा विश्वास तोडायचा नव्हता." श्वेता बच्चनला खूप आवडायचा वहिनी ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंड; त्याची ‘ही’ वस्तू जवळ घेऊन झोपायची, स्वतःच केलेला खुलासा काव्या कर्नाटकची पोस्ट अंबानींच्या लग्नाला हजेरी लावणं माझ्या मूल्यांच्या विरोधात होतं असंही काव्याने म्हटले आहे. अशा सोहळ्यांचा प्रचार करणे दिशाभूल करणारे आहे. माझ्या प्रामाणिकपणाने मला प्रेक्षकांचे प्रेम टिकवून ठेवायचे आहे, मला असे पैसे नको आहेत, असं काव्याने स्पष्ट केलं. "मला या लग्नाच्या प्रमोशनसाठी ३.६ लाख रुपयांची ऑफर मिळाली होती, जी नाकारणं सोपं नव्हतं. माझ्या आई-वडिलांचीही इच्छा होती की मी ही ऑफर स्वीकारावी, पण मी ती स्वीकारली नाही," असंही काव्याने नमूद केलं. १९ वर्षांचा संसार, बॉलीवूड अभिनेत्रीने पतीचं आडनाव हटवलं अन् चित्रपट झाला सुपरहिट; म्हणाली… कोण आहे काव्या कर्नाटक? who is Kavya Karnatac: काव्याचे यूट्यूबवर सात लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि इन्स्टाग्रामवर १६ लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात. काव्या तिच्या फॉलोअर्सना भारतातील विविध संस्कृतींबद्दल माहिती देते. काव्याने दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. लग्नाला झाली १० वर्षे, आई होऊ शकत नाहीये प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “माझ्या अन् पतीच्या वयातील अंतरामुळे…” अनंत अंबानीच्या लग्नात पाच हजार कोटींचा खर्च अनंत-राधिकाच्या लग्नात मुकेश अंबानी यांनी पाच हजार कोटी रुपये खर्च केले. जामनगर व इटलीतील क्रूझ प्री-वेडिंगनंतर १२ जुलैला मुंबईत अनंत-राधिकाचं लग्न झालं. या लग्नात व प्री-वेडिंगमध्ये जस्टिन बीबर, रिहाना, किम कार्दशियन, यांसारखे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी परफॉर्म करण्यासाठी आले होते. तसेच त्यांच्या रिसेप्शन व शुभ आशीर्वाद सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते.