लग्नबंधनात अडकली ही टेलिव्हिजन अभिनेत्री

करणवीर बोहरा, मौनी रॉय, अदा खान यांची लग्नसोहळ्याला उपस्थिती

aashka brent
शुक्रवारी ख्रिश्चन पद्धतीने आश्का- ब्रेंटचा लग्नसोहळा पार पडला

गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांच्या लग्नाच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. अशाच सेलिब्रिटींच्या यादीतील एक नाव म्हणजे आश्का गोरडिया. विविध मालिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही अभिनेत्री प्रियकर ब्रेंट गोबलेसोबत शुक्रवारी विवाहबंधनात अडकली.

शुक्रवारी ख्रिश्चन पद्धतीने आश्का आणि ब्रेंट विवाहबद्ध झाले. यावेळी टेलिव्हिजनचे बरेच कलाकार उपस्थित होते. आश्काचा जिवलग मित्र आणि अभिनेता करणवीर बोहरा त्याची पत्नी आणि दोन मुलींसह आवर्जून हजर होता. त्याचबरोबर मौनी रॉय, सना खान, अदा खान यांनासुद्धा लग्नसोहळ्यात पाहिलं गेलं.

https://www.instagram.com/p/BcLCGYyDP2o/

https://www.instagram.com/p/BcK3xrjge1A/

आश्का- ब्रेंटचा रविवारी हिंदू पद्धतीने लग्नसोहळा पार पडणार आहे. त्याआधी शनिवारी म्हणजेच आज मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम रंगणार आहे. आश्काच्या अहमदाबादमधील मूळ घरी हा विवाहसोहळा पार पडेल. हिंदू विवाहपद्धतीत आश्का सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अर्चना कोचरने डिझाईन केलेल्या लेहंग्यामध्ये पाहायला मिळणार आहे.

https://www.instagram.com/p/BcK9KPvDB5P/

https://www.instagram.com/p/BcK8CP9jCnt/

गेल्यावर्षी न्यूयॉर्कमध्ये ब्रेंटच्या घरी ख्रिश्चन पद्धतीने दोघांचा साखरपुडा झाला होता. पण त्यानंतर आश्काच्या नातेवाईकांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या आग्रहाखातर दोघांनी मुंबईत पारंपरिक पद्धतीने पुन्हा एकदा साखरपुडा केला. आश्काचं हे दुसरं लग्न आहे.

https://www.instagram.com/p/BcK5jL8gYnO/

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Inside pictures of aashka goradia and brent goble fairy tale wedding

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या