‘सकारात्मक राहण्याशिवाय काहीच पर्याय नाही’; कर्करोगाशी झुंज देणाऱ्या इरफानचा हृदयस्पर्शी व्हिडीओ

इरफान गेल्या वर्षभरापासून न्यूरोएन्डोक्राइन ट्युमरशी लढा देत आहे.

Irrfan died, Irrfan Khan
Irrfan Khan died at the age of 53 in Mumbai

गेल्या वर्षभरापासून न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या कर्करोगाशी लढा देणारा अभिनेता इरफान खान बॉलिवूडमध्ये लवकरच पुनरागमन करतोय. त्याच्या बहुप्रतिक्षित ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला. या पोस्टरसोबतच इरफानने त्याच्या चाहत्यांसाठी एक खास संदेश दिला आहे.

इरफानने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘अंग्रेजी मीडियम’च्या शूटिंगदरम्यानची क्षणचित्रे पाहायला मिळत आहेत. त्यासोबत इरफानने त्याच्या आवाजात हा संदेश रेकॉर्ड केला आहे.

काय म्हणाला इरफान?

मै आज आपके साथ हूँ भी और नहीं भी… ये फिल्म अंग्रेजी मीडियम बहुत खास है. सच, यकीन मानिए, मेरी दिल की ख्वाहिश थी की इस फिल्म को उतने ही प्यार से प्रमोट करू जितने प्यार से हम लोगोंने बनाया है. लेकिन, मेरे शरीर के अंदर कुछ अनवाँटेड मेहमान बैठे हुए है उनसे वार्तालाप चल रहा है. देखते है किस करवट उठ बैठता है. जैसा भी होगा, आपको इतेलाह कर दिया जाएगा. कहावत है.. when life gives you lemon, you make a lemonade (आयुष्य जेव्हा तुम्हाला तुमच्या हाती आंबट लिंबू देते तेव्हा त्यांचा गोड लिंबू सरबत बनवावा) बोलने मै अच्छा लगता है पर सच मै जब जिंदगी आपके हाथ मै निंबू थमाती है ना, तो शिकंजी बनाना बहुत मुश्किल हो जाता है. लेकिन आपके पास और चॉईस भी क्या है पॉझिटिव्ह रहने के अलावा? इन हालात मै निंबू की शिकंजी बना पाते है की नाही बना पाते है, ये आप पर है. पर हम सबने इस फिल्म को उसी पॉझिटिव्हिटी के साथ बनाया है. पर मुझे उम्मीद है की ये फिल्म आपको सिखाएगी, हसाएगी, रुलाएगी, फिर हसाएगी शायद!

इरफानवर लंडनमध्ये उपचार सुरू होते. या उपचारांनंतर तो शूटिंगसाठी भारतात परतला होता. मात्र अजूनही तो पूर्णपणे बरा झालेला नाही. म्हणूनच तो चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येऊ शकत नसल्याचं या व्हिडीओमध्ये त्याने सांगितलं.

अभिनेत्री राधिका मदान या चित्रपटात इरफानच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. तर करीना कपूर खान या चित्रपटात इरफानच्या पत्नीच्या भूमिका साकारणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Irrfan khan special message to his fans watch the video ssv

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या