‘हा आहे अरुंधतीचा नवा लूक?’, जाणून घ्या फोटोमागील सत्य

अरुंधतीची भूमिका साकारणारी मुधराणी गोखले प्रभूलकरने स्वत: याबाबत माहिती दिली आहे.

aai kuthe kay karte, arundhati, arundhati madhurani, madhurani gokhale prabhulkar,

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा कायमच चर्चेत असतो. मालिकेतील अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकरने तर महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता मालिकेतील अरुंधतीचा लूक बदलणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. स्वत: मधुराणीने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

मधुराणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने डेनिम जॅकेट आणि जीन्स परिधान केली आहे. तसेच तिने केस देखील कापल्याचे दिसत आहे. तिचा हा लूक सध्या चर्चेत आहे. तसेच हा मालिकेतील अरुंधतीचा नवा लूक असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आणखी वाचा : आर्यनला भेटण्यासाठी आजी-आजोबा मन्नतवर; बाल्कनीत दिसली शाहरुखच्या सासू-सासऱ्यांची झलक

मधुराणीने तिचा हा फोटो शेअर करत “हा आहे अरुंधतीचा नवा लूक, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका” असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे मालिकेत अरुंधतीचा लूक बदलणार या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या आई कुठे काय करते मालिका एका वेगळ्या वळणावर असल्याचे पाहायला मिळते. अरुंधतीने तिच्या नावावर असलेले घर गहाण ठेवले आहे. तर अनिरुद्ध घर हे बिल्डरला देऊन फ्लॅटमध्ये राहायचे असे अप्पा आणि आईला सांगतो. त्यामुळे आता अरुंधती हे घर विकू देणार की नाही? हे आगामी भागामध्ये पाहायला मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Is aai kuthe kay karte arundhati make over madhurani gokhale prabhulkar talk about it avb

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या