scorecardresearch

इम्रान खान घेणार पत्नी अवंतिका मलिकपासून घटस्फोट? चर्चांना उधाण

आमिर खानचा भाचा इमरान खान त्याची पत्नी अवंतिकापासून विभक्त होणार असल्याचं बोललं जात आहे.

imran khan, avantika malik, imran khan avantika separation, imran khan divorce, imran khan wife, avantika malik husband, avantika malik divorce, इमरान खान, अवंतिका मलिक, इमरान अवंतिका घटस्फोट, इमरान खान घटस्फोट, इमरान खान लग्न, आमिर खान, अवंतिका मलिक वय
इमरान खाननं २०११ मध्ये अवंतिका मलिकसोबत लग्न केलं होतं.

बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यानंतर तो फारसा कुठल्या चित्रपटात दिसला नाही. पण मागच्या काही काळापासून इम्रान त्यांच्या पत्नीसोबत बिघडलेल्या संबंधांमुळे चर्चेत आहेत. इम्रान खाननं २०११ मध्ये अवंतिका मलिकसोबत लग्न केलं होतं. मात्र २०१९ मध्ये या दोघांमध्ये भांडण सुरू असल्याचं समोर आलं. त्यानंतर सातत्यानं या दोघांमधील वादाची चर्चा झाली आणि आता दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

काही रिपोर्ट्सनुसार दोघांचेही नातेवाईक आणि मित्रपरिवाराने दोघांमधील नातेसंबंध सुधारण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले मात्र यात कोणालाच यश आलं नाही. विशेषतः इम्रानची पत्नी अवंतिकाने आपल्या लग्नाला आणखी एक संधी देण्याचा प्रयत्न केला मात्र ती देखील यात अपयशी ठरली. दोघांमधील वाद संपण्याचं नाव घेत नसल्यानं आता या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

आणखी वाचा- “पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे मी एकटी पडले होते अन्…” मुमताज यांचा धक्कादायक खुलासा

सध्या सोशल मीडियावर दोघांबद्दल उलट- सुलट चर्चांना उधाण आलं आहे. इम्रान खान आता हे नातं संपवण्याच्या विचारात असल्याचंही बोललं जात आहे. त्याची पत्नी अवंतिकानं हे नातं वाचवण्यासाठी तिला शक्य असलेले सर्व प्रयत्न केले मात्र या दोघांमध्ये सर्व काही ठीक होऊ शकलं नाही. ‘इ-टाइम्स’च्या रिपोर्टनुसार दोघांनी अखेर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप त्यांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेला नाही.

आणखी वाचा- “मी त्याच्यावर नेहमीच प्रेम केलं…” जेव्हा सोहेल खानबद्दल बोलली होती सीमा सचदेवा

दरम्यान इम्रान खान आणि अवंतिका मलिक यांनी २०११ मध्ये लग्न केलं होतं. दोघांनी ७ वर्षांची एक मुलगी देखील आहे. २०१९ पासून दोघंही वेगवेगळे राहत आहेत. मात्र मागच्या वर्षी मुंबईच्या ट्राइडेंट हॉटेलमध्ये एका लग्नसोहळ्यात दोघंही एकत्र दिसले होते. आता सोशल मीडियावर हे दोघंही वेगळे होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. मात्र दोघांनीही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Is actor imran khan about to divorce with wife avantika malik mrj

ताज्या बातम्या