ड्रग्ज प्रकरणाचा फटका, अनन्याला विजयच्या चित्रपटातून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता?

जाणून घ्या काय आहे सत्य, अनन्याच्या जवळच्या एका व्यक्तीने याबाबत माहिती दिली आहे.

Shah Rukh Khan,Aryan Khan,Thalapathy 66,Pati Patni Aur Woh,Thalapathy Vijay,Ananya Pandey,Vijay Deverakonda,

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. तो लवकरच ‘थलपती 66’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता अनन्याला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मुंबई-गोवा क्रूझवरील अंमली पदार्थांच्या पार्टीप्रकरणी एनसीबीने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केली. गेल्या जवळपास १९ दिवसांपासून तो तुरुंगात आहे. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्ह दिसत नाही. दरम्यान, आर्यन खान आणि अनन्या पांडे या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. त्यातून धक्कादायक खुलासे होत आहेत. या पार्श्वभूमीवर अनन्या पांडेची ड्रग्जप्रकरणी एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. त्यानंतर आता अनन्याला ‘थलपती 66’ या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
आणखी वाचा : चाहतीच्या प्रेमात पडला अन् केलं लग्न, जाणून घ्या तमिळ सुपरस्टार विजयची लव्हस्टोरी

वाचा : मी तुझ्यासाठी गांजाची व्यवस्था करते; ‘त्या’ चॅटसंबंधी विचारल्यानंतर अनन्या NCBला म्हणाली, “मी तर मस्करी…”
आता अनन्याच्या जवळच्या एका व्यक्तीने बॉलिवूड लाइफला याबाबत माहिती दिली आहे. ‘अनन्याला या चित्रपटाची ऑफर देखील देण्यात आली नव्हती. त्यामुळे तिला चित्रपटातून कसे बाहेर काढले जाऊ शकते? या सर्व चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. अनन्याकडे इतर काही प्रोजेक्ट्स आहेत आणि ती त्यामध्ये व्यग्र आहे. थलपती 66 विषयी काही बोलणे देखील झालेले नाही’ असे म्हटले आहे.

अनन्याने ‘स्टूडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात दिसली होती. तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केले आहे. ती ‘खाली पीली’ या चित्रपटात दिसली होती. आता ती लवकरच अभिनेता विजय देवरकोंडासोबत ‘Liger’ या चित्रपटात दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Is ananya panday removed from south actor vijay film thalapathy 66 avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी