scorecardresearch

हार्दिक पंड्या दिसणार ‘केजीएफ ३’मध्ये? ‘रॉकी भाई’बरोबरच्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

हार्दिक पंड्या ‘केजीएफ ३’मध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण

हार्दिक पंड्या दिसणार ‘केजीएफ ३’मध्ये? ‘रॉकी भाई’बरोबरच्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण
हार्दिक पंड्या 'केजीएफ ३'मध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत असलेल्या ‘केजीएफ’ या चित्रपटाने सगळ्यांना वेड लावलं होतं. या चित्रपटाचा दुसरा भाग एप्रिल २०२२ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. रॉकी भाईच्या क्रेझ आजही कायम आहे. ‘केजीएफ २’ नंतर या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या प्रेक्षक प्रतीक्षेत आहेत.

‘केजीएफ ३’ मधील रॉकी भाईचा नवीन अंदाज पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण त्याबरोबरच आणखी एका गोष्टीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या केजीएफ ३मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हार्दिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन रॉकी भाईबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा>>‘पावनखिंड’ फेम अभिनेत्याने शेअर केला रायगडावरील फोटो, म्हणाला “सांगा सरकार…”

हार्दिकने शेअर केलेला यश व कृणाल पंड्याबरोबरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोला त्याने ‘केजीएफ ३’ असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे हार्दिक व कृणाल ‘केजीएफ ३’ चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हार्दिकच्या या पोस्टवर चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> ब्राझील फुटबॉलपटू पेले यांचा जीवनप्रवास पाहायचा आहे का? नेटफ्लिक्सवरील ‘हा’ बायोपिक नक्की पाहा

हेही वाचा>> “धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर…”, तुनिषाच्या आईचे शिझान खान व कुटुंबियांवर गंभीर आरोप

हार्दिक सध्या श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या टी-२० सीरिजचा कर्णधार आहे. त्याच्या खेळीने तो नेहमीच क्रिकेटप्रेमींची मनं जिंकून घेतो. आयरलॅंड व न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टी-२० सीरिजमध्ये हार्दिकने त्याच्या नेतृत्वात भारतासाठी चांगली कामगिरी केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 12:53 IST

संबंधित बातम्या