बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिक रोशन हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. हृतिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात हृतिक रोशन हा अभिनेत्री सबा आझादसोबत हातात हात घालून फिरताना दिसत होता. त्यामुळे ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशा चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा हृतिक आणि सबा दुसऱ्यांदा डेटवर जाताना दिसले. त्यांच्या या डेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सबा आणि हृतिकचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे एका कॅफेमधून बाहेर येताना दिसत आहेत. बाहेर पडताना ते एकमेकांचा हात पकडून असल्याचे दिसले. दरम्यान, हृतिक सबाची काळजी करताना दिसत होता. सध्या सबा आणि हृतिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Bengaluru firm workers hire goons to beat strict colleague arrested video viral
कामाचा दबाव टाकणाऱ्या व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांनी गुंडांच्या मदतीने केली बेदम मारहाण; पाहा धक्कादायक Video
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

काही दिवसांपूर्वी सबाला हृतिक रोशनसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने काहीही उत्तर दिले नाही. ई- टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाबाबत सबा आझाद यांच्याशी संपर्क साधला असता तिने त्यांचा प्रश्न ऐकला. पण तिने त्यावर फार मोजक्या शब्दात उत्तर देत फोन डिस्कनेक्ट केला.

सबा आझाद नेमकी कोण?

सबा आझाद ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. सबाने २००८ मध्ये ‘दिल कबड्डी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यात ती राहुल बोससोबत झळकली होती. त्यानंतर २०११ मध्ये तिने ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. सबाला गायनासोबतच थिएटरचीही प्रचंड आवड आहे. तिने अभिनेता नसरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाह याच्यासोबत ‘मॅडबॉय/मिंक’ या इलेक्ट्रॉनिक बँडचीही सुरुवात केली आहे. लवकरच ती ‘सोनी लिव्ह’वरील आगामी वेब सीरिज ‘रॉकेट बॉईज’ मध्ये दिसणार आहे. येत्या ४ फेब्रुवारी रोजी ही वेबसीरिज रिलीज होणार आहे.