झी मराठी अवॉर्ड्समध्ये कंगना रणौत? जाणून घ्या सत्य

सध्या सोशल मीडियावर कंगनाने झी मराठी अवॉर्डस शोमध्ये हजेरी लावल्याची चर्चा सुरु आहे.

kangana ranut, kangana ranut visit, zee marathi,

बॉलिवूडमध्ये सतत प्रचंड चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. तिच्या लोकप्रियते इतकीच तिची सगळीकडे चर्चा असते असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. नुकतंच संपन्न झालेल्या झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये देखील कंगनाने हजेरी लावल्याची चर्चा सुरु आहे. पण हे खरं आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्या मागचे सत्य.

झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये कंगना नाही तर श्रेया बुगडेने एका प्रहसनात कंगनाची भूमिका साकारली. पण तिने इतकी हुबेहूब कंगनाची भूमिका साकारली कि सगळ्यांना खरोखर मंचावर कंगनाच आहे की काय असा प्रश्न पडला होता.

हे प्रहसन पाहताना तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या कलाकारांच्या हसून हसून डोळ्यात पाणी आले आणि श्रेयाच्या मिमिक्रीचं सगळ्यांनी कौतुक देखील केले. चला हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी सादर केलेल्या या दिवाळी अधिवेशनात कंगना सोबत अनेक राजकारणी सहभागी होणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Is kangana ranut come as guset in zee marathi award avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या