२०२१ मध्ये दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हे दोघे वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांनाही चांगलाच धक्का बसला होता. यापाठोपाठ समांथाच्या आजारपणाची बातमी समोर आली. नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यावर या दोघांच्या नात्याबद्दल बऱ्याच गोष्टी बाहेर येत होत्या. दरम्यान नागा चैतन्य एका बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याची बातमी समोर आली होती. घटस्फोटानंतर नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धूलीपालाला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. अर्थात याबद्दल दोघांपैकी कुणीच खुलासा केला नसला तरी आता समोर आलेल्या एका फोटोमुळे या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमुळे हे दोघे रिलेशनमध्ये असल्याचं म्हंटलं जात आहे. आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणारा 'अवतार २' पाहता येणार 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर; पण द्यावे लागणार 'इतके' पैसे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये नागा चैतन्य एका लोकप्रिय शेफबरोबर दिसत आहे. या फोटोमध्ये मागे शोभिता धुळीपालाही आपल्याला दिसत आहे. या फोटोमध्ये तिने चेहेरा झाकायचा प्रयत्न केला असला तरी नेटकऱ्यांनी तिला बरोबर ओळखलं आहे. हा व्हायरल फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांनी हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा कयास बांधला आहे. इतकंच नव्हे तर हा फोटो त्यांच्या लंडनमधील एका डिनर डेटदरम्यानचा असल्याचंही म्हंटलं जात आहे. फोटो : सोशल मिडिया शेफ सुरेन्द्र मोहन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा फोटो शेअर केला होता. सुरेन्द्र यांनी इतरही सेलिब्रिटीजबरोबरचे फोटोज त्यांच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. नागा चैतन्यबरोबरच्या या फोटोमुळेच ते जास्त चर्चेत आले आहेत. नागा चैतन्यने २०१७ मध्ये समांथाशी लग्नगाठ बांधली होती. नंतर कालांतराने दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाल्याने २०२१ मध्ये त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला होता. समांथाचा नुकताच प्रदर्शित झालेला 'यशोदा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठीक ठाक चालला. नागा चैतन्यनेही नुकतंच आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.