बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे रिया चक्रवर्ती. रिया बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘बिग बॉस १५’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा अभिनेत्री तेजस्वी प्रकाश, दलजीत कौर आणि रिया चक्रवर्ती हे एकाच स्टूडिओच्या बाहेर दिसल्यामुळे सुरु झाल्या होत्या. पण बिग बॉसच्या घरात येण्यासाठी रियाने एका आठवड्यासाठी तगडे मानधन घेतले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

रियाने बिग बॉस १५मध्ये सहभागी होण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे ती बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दिसणार आहे की पहिल्याच दिवशी स्पर्धकांचे स्वागत करण्यासाठी परफॉर्म करणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी रिया एका आठवड्याचे ३५ लाख रुपये मानधन घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by FK Videos (@fkvideoss)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिग बॉस १५ हा शो २ ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अभिनेत्री शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल, डोनल बिष्ट, करण कुंद्रा, निधी भानुशाली हे कलाकार बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.