scorecardresearch

सैफ अली खानचा मुलगा डेट करतोय ‘या’ अभिनेत्रीच्या मुलीला? फोटो चर्चेत

इब्राहिमचे डिनर डेटला जातानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Ibrahim Ali Khan, Palak Tiwari, Ibrahim Ali Khan and Palak Tiwari Spot together, Shweta Tiwari daughter Palak, Ibrahim Ali Khan and Palak Tiwari Video, Ibrahim Ali Khan and Palak Tiwari relationship, Social Media, Viral Video, इब्राहिम अली खान, पलक तिवारी,

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि त्याचे कुटुंबीय सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्याची मोठी मुलगी सारा अली खान आणि इब्राहिम हे त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता इब्राहिमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत एक मुलगी दिसत आहे. त्यांच्या या फोटोवरुन ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

सध्या सोशल मीडियावर इब्राहिमचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये तो अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीसोबत दिसत आहे. शुक्रवारी इब्राहिम आणि पलक तिवारी एकाच गाडीतून फिरताना दिसले होते. त्यावेळी काही फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो काढले. दरम्यान, इब्राहिमने फोटोग्राफर्सला स्माइल दिली तर पलकने चेहरा लपवण्याचा प्रत्न केला.
आणखी वाचा : फक्त जेवायला मिळेल म्हणून मी पार्ट्यांमध्ये डान्स करायचो; मिथुन चक्रवर्तींचा खुलासा

पलक आणि इब्राहिमचा एकत्र फिरतानाचा व्हिडीओ बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने शेअर केला आहे. दोघेही शुक्रवारी डिनर डेटवर एकत्र गेल्याचे म्हटले जात आहे. पण पलकने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. पलकने असे का केले? इब्राहिम आणि पलक एकमेकांना डेट करत आहेत का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

पलक आणि इब्राहिमच्या या व्हिडीओवर एका यूजरने कमेंट करत ‘पलकने तोंड का लपवले आहे’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘तोंड लपवले… आता आई ओरडणार’ असे म्हणत पलकची खिल्ली उडवली आहे. तर काही यूजरने करीनाला टारगेट केले आहे. ‘आता करीना सल्ला देईल हिला डेट करु नकोस’ अशी कमेंट एका यूजरने केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Is saif ali khan son ibrahim dating shweta tiwari daughter palak photo viral avb

ताज्या बातम्या