दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट २९ एप्रिल २०१६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावले. या चित्रपटातले प्रत्येक गाणे आणि संवाद सुपरहिट ठरले. त्यासोबतच यातील कलाकार मंडळींनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. आर्ची, परश्या, सल्या आणि लंगड्या या भूमिका साकारणाऱ्या नवोदित कलाकारांनी पहिल्याच चित्रपटातून त्यांच्यातील अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली. आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू ही कायमच चर्चेत असते. नुकताच तिचे डिनर डेटला जातानाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रिंकू कुणाला डेट करते अशा चर्चा रंगल्या होत्या. आता या अभिनेत्याने स्वत: सोशल मीडियावर रिंकूसोबत डिनर डेटला जातानाचे फोटो पोस्ट केले आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून आकाश ठोसर आहे. आकाशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला रिंकुसोबतचा डिनर डेटला जातानाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरुन त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आणखी वाचा : कोणी म्हणायला नको, अलकाताईंच्या मुलींचे दुधाचे पैसे आम्ही दिले; मिलिंद गवळची पोस्ट चर्चेत

रिंकू राजगुरू सैराटनंतर ‘मेकअप’, ‘कागर’ या मराठी चित्रपटांमध्ये दिसली होती. तसेच तिने ‘१००’,’अनपॉज्ड’,’२०० हल्ला हो’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. त्यानंतर लवकरच आता ती ‘छुमंतर’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. आकाशने ‘लस्ट स्टोरीज’,’१९६२ द वॉर इन दी हिल्स’ या सीरिजमध्ये काम केले आहे. तसेच ‘एफ यू-फ्रेंडशीप अनलिमिटेड’ या चित्रपटात तो झळकला होता.